ji24news

रोटरी क्लब ऑफ दिवा ठाणे अध्यक्षपदी हर्षद सोमनाथ भगत यांची निवड..

रोटरी क्लब ऑफ दिवा ठाणे अध्यक्षपदी हर्षद सोमनाथ भगत यांची निवड

ji24news thane


गुरुवार दि 8 जून 2023 रोजी रोटरी क्लब ऑफ दिवा ठाणे या क्लबच्या वर्धापन दिना निमित्त नवीन अध्यक्षांचा पदग्रहण सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. प्रमुख पाहुणे म्हणून रोटरी जिल्हा 3142 प्रांतपाल मिलिंद कुलकर्णी तसेच उपप्रांतपाल संजीव जोशी उपस्थित होते.
त्यांच्या हस्ते नवनिर्वाचित अध्यक्ष हर्षद भगत यांना अध्यक्ष पदाचा तर आदित्य पाटील यांना सचिव पदाचा कारभार सोपवण्यात आला. या प्रसंगी मावळते अध्यक्ष रोटरियन अभिषेक ठाकूर यांनी नवीन अध्यक्षांना पुढील वाटचालीसाठी मार्गदर्शन केले. नवनिर्वाचित अध्यक्ष हर्षद भगत यांनी याप्रसंगी दिवा शहरात अत्याधुनिक डायलिसिस केंद्र उभारण्याची तसेच दिवास्थानक सुशोभीकरण, दिव्यातील नागरिकांकरिता विविध आरोग्य तपासणी, विद्यार्थ्यांकरीता दिवा ओलंपियाड आयोजन करणे तसेच महिला सशक्तिकरण करीता कार्यक्रम राबविण्याची हमी दिली.
रोटरी क्लब ऑफ दिवा ठाणे मध्ये गजानन पाटील ,अंकुर मुंडे, डॉ. पराग जोशी यांचे नवीन सदस्य म्हणून स्वागत करण्यात आले.
त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी रोटरियन स्वप्निल गायकर, साईनाथ म्हात्रे, युवराज बेडेकर , अभिजीत अलीमकर , डॉ. कुणाल गायकर, नंदू किणे, किशोर पाटील ,गणेश टावरे , प्रवीण म्हात्रे , प्रतीक बेडेकर ,वैष्णव पाटील उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन रोटरीन अमिता गायकर यांनी केले. याप्रसंगी क्लब मधील सर्व सदस्यांनी हर्षद भगत यांना कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

ji24news
Author: ji24news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Panchang

Gold & Silver Price

Top News

Advertisement

Our Visitor

0 1 0 8 2 9
Total Users : 10829

Covid Update

जि.प.उच्च प्राथ.शाळा बांधण शाळेत अक्षरधारा फाउंडेशन ट्रस्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेतील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक शाहित्य.

आदिवासी हक्क संघर्ष समितीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न…

20 वर्षांपासून पुलाची प्रतीक्षा; हिरडपाडा ग्रामस्थांचा मतदान बहिष्काराचा इशारा.लेंडी नदीवरील कायमस्वरूपी पुलासाठी दोन दशकांचा संघर्ष; ८ हजार नागरिकांचा प्रश्न ऐरणीवर

अल्ट्रा चॅम्पियन ” विशाल वळवीच्या उत्कृष्ट कामगिरीचा आदिवासी बांधवांकडून सन्मान.

अतिवृष्टीमुळे सांबरपाड्याचा एकमेव रस्त्यावर दरड कोसळून; ग्रामस्थांची मोठी गैरसोय, आमदारांना दिलेल्या निवेदनानंतरही कार्यवाही नाही

विक्रमगड आठवडे बाजाराला भरभरून प्रतिसाद मात्र शौचालयाची असुविधा – जनतेसाठी मोठा प्रश्न ?

मोखाडा तालुक्यातील १० वी-१२ वी च्या विद्यार्थ्यांना आनंददायी परीक्षेसाठी वैशाली पाटील यांचे मार्गदर्शन.

रोमहर्षक सामन्यात के के किंग 11संघाची बाजी.

दुसऱ्या फ्रीस्टाईल स्केट कार्टींगच्या नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये मोखाडा तालुक्यातील गाडर भगिनींनी पटकवाले दोन गोल्ड व एक ब्रॉन्झ मेडल्स.

पालघर: एसटीच्या लहरी कारभारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात; परीक्षेलाही पोहोचण्यास होतोय उशीर