
एक पाऊल “सौ.हिरा जाधव फाऊंडेशन – मुंबई ” यांच्या वतीने आमची जि. प. शाळा- कळमवाडी येथे शैक्षणिक साहित्याचे वाटप…
ji24newsवृत्तसेवा मोखाडा ग्रामीण – रामदास गाडर
एक पाऊल “सौ.हिरा जाधव फाऊंडेशन” मुंबई अंतर्गत आमची जि. प. शाळा कळमवाडी ता.मोखाडा येथील विद्यार्थ्यांना स्कूल बॅग, सॅन्डल, पाऊच व खाऊचे वाटप करण्यात आले. यावेळी श्री.मनीष सर,श्री.घुले सर,श्री.गणेश गजेवर सर, श्री.रहिस सर कु.संगिता सिस्टर
सौ.सोनाली सिस्टर सर्व टीम आवर्जून उपस्थित राहिले. तसेच ज्या टीमच्या सदस्यांना वेळे अभावी उपस्थित राहता आले नाही त्या सदस्यांनी देखील वस्तूरूपाने आपली मदत विद्यार्थ्यांना टीमजवळ पोहचवली. शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच एक पाऊल “सौ.हिरा जाधव फाऊंडेशन – मुंबई ” यांच्या वतीने शैक्षणिक साहित्य, सॅन्डल आणि स्कुल बॅग मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.पाटील सर यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री. भालचंद्र धनगरे सर यांनी केले.
Total Users : 10828