
पालघर जिल्हा . रेपोर्टर – रोटरी क्लब ऑफ बॉम्बे बेव्यु चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई यांचे माध्यमाने रविवारी दिनांक 3 एप्रिल 2022 रोजी “ग्रामीण शिक्षण संस्था संचलित” नूतन विद्या मंदिर उमरोळी ता. जि. पालघर येथे आयोजित उमरोळी व पारगाव केंद्रामधून 30 शाळांना खेळाचे साहित्य वाटप करण्यांत आले .
सदर कार्यक्रमास रोटरी क्लब ऑफ बॉम्बे वेव्यु चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा सौ. जंखना मेहता .स्पोर्ट डायरेक्टर श्री. प्रितम सामंत, क्लब ट्रेनर श्री .दर्शन मेहता कॉर्डिनेटर श्री. मनिष सारिया व सौ. रंजनी बरासिया हे प्रमुख पाहुणे म्हणून कार्यक्रमास उपस्थित होते. अध्यक्षा यानिमित्तानं विद्यार्थ्यांना संबोधित केले.तसेच अन्य पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना खेळा विषयी महत्व पटवून दिले, व कार्यक्रमास संस्थेचे सरचिटणीस श्री. भूषण पाटील ,शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष श्री. राजेश पाटील सदस्य श्री. यतीन वझे ,श्री. भूपेश तरे, श्री .राजेंद्र जाधव ,श्री. अजय पाटील श्री. शांताराम बरड ,मुख्याध्यापिका सौ .दिपाली पाटील यांची उपस्थिती लाभली तसेच शाळेचे उमरोळी केंद्र व पारगाव केंद्र शाळेतील सर्व शिक्षक वृंद होते तसेच विद्यार्थी उपस्थित होते. सदर कार्यक्रमांमध्ये अध्यक्ष सौ रंजनी मेहता यांनी मुलांना शिक्षणाविषयी महत्त्व सांगून मुलींना गुलाब पुष्प देऊन हितगुज केले.
या कार्यक्रमाचे नियोजन नूतन विद्या मंदिर उमरोळी शाळेचे सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी केले.
दरम्यान कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. म्हात्रे यांनी केले तर उपस्थित पाहुण्यांचे आभार श्री. संखे यांनी केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

Total Users : 10829