
जिजाऊच्या दिव्यांग शाळेत गुरूपौर्णिमा साजरी.
विक्रमगड प्रतिनिधीji24news – प्रशांत दाव्हाड
विक्रमगड – गुरु हे आपले जीवन घडवून देणारे असतात खरी सुरुवात आई कडून होते आणि वडील यांचा सुद्धा जीवनाला चालना देण्यासाठी मोलाचा वाटा असतो. तसेच आपण बाहेर पडलो की आपणास शाळेतील त्याच पद्धतीने बाहेर इतर ठिकाणी मिळालेले ज्ञान आणि देणारे मार्गदर्शन ते सुध्दा गुरूच असतात. म्हणून गुरुपौर्णिमा हा दिवस आला की मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. अश्याच प्रकारचे
विक्रमगड तालुक्यातील जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था,महाराष्ट्र संचलित जिजाऊ अंध व मतिमंद मुलांच्या निवाशी शाळा झडपोली या शाळेत गुरूपौर्णिमा(व्यास पौर्णिमा) मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.कार्यक्रमाची सुरुवात दिप प्रज्वलन व विधेची देवता सरस्वती मातेच्या आणि थोर माता जिजाबाई यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दिपप्रज्वलन करण्यात आले.या वेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर करून व गुलाब पुष्प देऊन उपस्थितांच स्वागत करण्यात आले.या वेळी या दिव्यांग विध्यार्थींनी एक सुंदर गीत सादर केले. गुरू ने दिला ज्ञान रुपी वसा आम्ही चालवू हा पुढे वारसा.हे गीताचे बोल होते.तसेच गुरूवर आधारीत कथा व गीते सादर करण्यात आली.तसेच विध्यार्थींनी भाषेने केली.शिक्षकांनी मुलांना मार्गदर्शन केले.अध्यक्षीय भाषण शाळेचे मुख्याध्यापक श्री. महेश गायकवाड सर यांनी केले त्यांनी मुलांना मोलाचे मार्गदर्शन केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
Total Users : 10829