
शाळेतील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना साहित्य वाटप…
विक्रमगड प्रतिनिधी – ji24news प्रशांत दाव्हाड
विक्रमगड – शाळा म्हटले की मंदिर मानले जाते. आणि या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना योग्य ते ज्ञान मिळणे आवश्यक असते.
आणि म्हणून त्यासाठी शाळेतील विद्यार्थ्यांना योग्य त्या साहित्याची गरज असते जसे की वह्या, पुस्तके असे विविध प्रकारचे साहित्याची आवश्यकता असते.
अश्याच प्रकारची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी दि.1/07/2023 रोजी अक्षरधारा फाउंडेशन ग्रुप मुंबई या ग्रुप ने योग्य ती साहित्य वाटप केलेली आहेत. हे वाटप करत असताना आदरणीय प्रदिप शर्मा साहेब यांच्या विद्यमाने जि.प.उच्च. प्राथ. शाळा डोल्हारी बुद्रुक शाळेतील होतकरू व गरजू अतिशय दुर्गम भागात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप करण्यात आले.
याप्रसंगी अक्षरधारा फाउंडेशन ग्रुपचे सदस्य गोरा साहेब व इतर सदस्य होते तसेच शा.व्या.समितीचे अध्यक्ष श्री किसन खरपडे,उपसरपंच महेश खरपडे,व सदस्य आणि शाळेचे नवनिर्वाचित मुख्याध्यापक श्री सुरेश भोये सर,श्री. संतोष उमतोल सर,श्री. विष्णू उमतोल सर, मेघा ठाकरे मॅडम उपस्थित होते. एकंदरीत शाळेची क्रीडा क्षेत्रातील प्रगती, शाळा व परिसर बघून शिक्षकांचे कौतुक केले
Total Users : 10829