
पुरात वाहून गेली वाकी येथील स्मशानभूमी
नवीन स्मशानभूमी मंजूर करण्याची ग्रामस्थांची मागणी..
विक्रमगड / प्रतिनिधी – दीपक भोये
विक्रमगड तालुक्यातील वाकी ग्राम मंडल अंतर्गत वाकी गावासाठी नदीपात्रात असलेल्या स्मशानभूमीचे बांधकाम पावसाच्या पुरात अनेक वर्षापासून झालेल्यांचा अंत्यविधी हा नदीपात्रात करावा लागत आहे .
सध्याच्या स्थितीमध्ये वाकी गावामध्ये ४५० घरे असून जवळपास ३५०० एवढी लोकसंख्या असून त्यानुसार गावाशेजारील असलेल्या नदीपात्रामध्ये स्मशानभूमी बांधण्यात आली होती. मात्र ही बांधलेली स्मशानभूमी अतिवृष्टीमुळे ६ वर्षा पूर्वी पुरात वाहून गेली. तेव्हापासून येथील मृत झालेल्यांचा अंत्यविधी हा नदीपात्रात करावा लागत आहे. पावसाळ्यात पावसाचे प्रमाण जास्त असल्याने नदीला पूर येत असतो. यावेळी अंत्यसंस्कार विधी करते वेळी मृतांचे शव पुराच्या पाण्यात वाहून जाण्याची शक्यता असल्याने या गावासाठी नवीन स्मशानभूमी बांधण्याला मंजुरी मिळावी अशी मागणी गावकऱ्यां कडून होत आहे.
“वाकी गावासाठी नदी लगत बांधलेल्या स्मशानभूमीचे बांधकाम पुरात वाहून गेले असल्याने पाच सहा वर्षापासून नदी पात्रात अंत्यविधी करण्यात येत आहे. पावसाळ्यात अंत्यविधीसाठी अडचणी येत असल्याने शासनाने वाकी गावासाठी नवीन स्मशानभूमी बांधण्यासाठी मंजुरी द्यावी.”
मिलिंद महाकाळ सामाजिक कार्यकर्ता ( वाकी ग्रामस्थ )
Total Users : 10829