
ji24news vikramgad
नेहरू युवा केंद्र पणजी,गोवा व किल्ले पर्यटन महोत्सव सेवा संशोधन केंद्र सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त सहभागातून राष्ट्रीय युवा सामाजिक कला संभेलन पणजी गोवा येथे रविवार दि.9 जुलै 2023 रोजी अतिशय आनंदात व जल्लोषात पार पडणार आहे.विक्रमगडचे सुपुत्र,अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा माण, ता.विक्रमगड,जि.पालघर येथील माध्यमिक शिक्षक तसेच मोहो गावचे रहिवासी श्री.चेतन रमेश ठाकरे सरांना यावर्षीचा “युथ एज्युकेशन आयकॉन अवार्ड ” जाहीर झाला आहे.ठाकरे सरांना अनेक राज्यस्तरीय तसेच आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.ते अतिशय होतकरू,मेहनती,शिस्तप्रिय,विद्यार्थीप्रिय असून अनेक आदर्श विद्यार्थी घडविले आहेत. त्यांचे आदर्श असे व्यक्तिमत्व आहे.शैक्षणिक, सामाजिक, कृषी, क्रीडा, सांस्कृतिक व साहित्य क्षेत्रात त्यांचे उल्लेखनीय कार्य आहे.प्रकल्प कार्यालय जव्हार, संस्थेचे पदाधिकारी,आश्रमशाळेचे मुख्याध्यापक,शिक्षक वृंद,सर्व कर्मचारी,विद्यार्थी तसेच पालघर जिल्ह्यातून सरांवर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.
Total Users : 10829