
डॉ.हेमंत विष्णु सवरा यांच्या वतीने मोखाडा तालुक्यातील जि.प.शाळांना वह्या वाटपाचा कार्यक्रम संपन्न…
जोहार इंडिया 24 न्यूज – रामदास गाडर
मोखाडा दि.07 जुलै,डॉ.हेमंत विष्णु सवरा आणि टीमच्या वतीने मोखाडा तालुक्यातील जि.प.शाळांना वह्या वाटपाचा कार्यक्रम दि.05 जुलै रोजी संपन्न झाला.
शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच विद्यार्थ्यांना अभ्यासाकरिता वह्या मिळाल्या तर त्यांना अधिक आनंद होऊन विद्यार्थी अधिक जोमाने अभ्यासाला लागतात. त्याअनुषंगाने डॉ.हेमंत विष्णु सवरा यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री पालघर जिल्हा- मा. श्री. रविंद्रजी चव्हाण साहेब यांच्या सूचनेनुसार व भाजपा जिल्हाध्यक्ष पालघर – श्री.नंदकुमार पाटील,जेष्ठ नेते – बाबाजी काठोळे सर यांच्या मार्गदर्शनाने मोखाडा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा चास, आसे, बेरिस्ते,घानवळ,दांडवळ आणि तुळयाचापाडा येथील विद्यार्थ्यांना वह्या वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला.
या वह्या वाटपाच्या कार्यक्रमाच्या वेळेस भाजपा जिल्हा उपाध्यक्ष- श्री.संतोष चोथे, तालुका अध्यक्ष – श्री.विठ्ठल पाटील, पालघर जिल्हा सचिव- श्री.जयराम निसाळ, आदिवासी विकास आघाडी जिल्हाध्यक्ष – श्री.मिलिंद झोले, तालुक्यातील ज्येष्ठ नेते- श्री.रघुवीर डिंगोरे,नरेंद्र पाटील, राजेंद्र पाटील,विलास पाटील, हनुमंत पादीर, दिलीप झुगरे,दिशांत पाटील,प्रतीक पाघारे,जनार्दन गभाले,भरत नडगे,किशोर भवारी, आनंद शिंदे , रघुनाथ पाटील, हेमंत वझे तसेच इतर तालुका पदाधिकारी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.

Total Users : 10829