ji24news

वर्धा डायटच्या ‘वारली पेंटिंग’ उपक्रमाची राष्ट्रीय स्तरावर दखल…

वर्धा डायटच्या ‘वारली पेंटिंग’ उपक्रमाची राष्ट्रीय स्तरावर दखल

प्रा.दिनेश राठोड ji24newsजिल्हा प्रतिनिधी – वर्धा

नवीन शैक्षणिक धोरणाच्या तिसऱ्या वर्षाच्या निमित्ताने शिक्षा मंत्रालय भारत सरकार यांच्याकडून प्रकाशित केल्या जात असलेल्या कॉफी टेबल बुक मध्ये भारतातील 6 नवोपक्रमाचा समावेश असून यामध्ये महाराष्ट्रातील जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था, वर्धेच्या ‘वारली पेंटिंग’ या उपक्रमाचा समावेश करण्यात आला आहे.
सदर ई कॉफी टेबल बुकचे प्रकाशन लवकरच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. ‘वारली पेंटिंग’ हा उपक्रम जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, वर्धा वतीने राबविण्यात आला. महाराष्ट्रातील वारली आदिवासी जमातीने समाजाला वारली कलेची देण दिलेली आहे. भारतीय सांस्कृतिक जीवनाच्या समृद्धी करीता आदिवासी कलेचे मोठे योगदान आहे.
हा समृद्ध वारसा लक्षात घेत जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेने स्वतंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त बाला (बिल्डिंग एज अ लर्निंग एड) उपक्रमांतर्गत ‘वारली पेंटिंग’ उपक्रम सुरू केलेला होता. या उपक्रमांतर्गत जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या प्रशिक्षकांनी वारली पेंटिंग चे धडे दिले. तीन दिवशीय कार्यशाळेत शिक्षकांच्या मागणीनुसार एकूण आठ बॅच घेण्यात आल्या. तसेच जिल्ह्यातील विद्यार्थी, जिल्हा कोषागार कार्यालय कर्मचारी, वर्धा जिल्हा कारागृहातील बंदीजणांसाठी देखील कार्यशाळा आयोजित करण्यात आली. या उपक्रमामुळे वर्धेतील शिक्षक वर्गात विद्यार्थ्यांना वारली पेंटिंग शिकवत असून ही चित्रे काढण्याचे प्रत्यक्ष अनुभव विद्यार्थ्यांना मिळत आहे. इयत्ता दुसरी इयत्ता सहावीच्या मराठी पाठ्यपुस्तकात वारली चित्रकलेचे धडे व चित्रे समाविष्ट आहे. वारली पेंटिंग मध्ये भौमितिक आकार असल्याने चित्र काढणे सोपे जाते भिंतीवर वारली चित्रामुळे विद्यार्थी शिक्षकांना आनंद मिळत आहे. शाळेच्या भिंतीवर, विहिरीवर झाडाच्या बुंध्यावर, कुंड्यावर, पाण्याचे टाकीवर,दारावर, शाळेच्या गेटवर, जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेत वारली पेंटिंग करण्यात आलेली आहे.
यामुळे शंभर वर्ष पूर्ण केलेल्या इमारतीच्या सौंदर्यात अधिक भर पडलेली आहे. विविध विषयावर वारली चित्रे शाळेत पाहायला मिळत असून वारली आकृती,वारली एक्सप्रेस, दांडी यात्रा,सेवाग्राम आश्रम इत्यादी रेखाटन केलेले आहे.या माध्यमातून झाडे लावा,कोरोना जनजागृती, मुलींना शिकवा -मुलींना वाचवा, स्वच्छ शाळा,निपुण भारत, शिक्षणाचा अधिकार इत्यादी सामाजिक संदेश देण्यात आलेला आहे. वारली पेंटिंगच्या आकृत्यामुळे विद्यार्थ्यांना गणित विषयासंदर्भात पूर्वगणना, इंग्रजी मराठी भाषेतील क्रिया शब्द शिका, भूगोल, इतिहास यात अध्ययनात उपयोग होत आहे.आर्ट इंटिग्रेटेड लर्निंग अद्यापन शास्त्राचा वापर अध्यापनात केला जात आहे आणि कला ही अभ्यासक्रमासोबत जोडली जात आहे. वारली पेंटिंग उपक्रमात जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य, वरिष्ठ अधिव्याख्याता,अधिव्याख्याता, कर्मचारी, जिल्ह्यातील मुख्याध्यापक व कलाप्रेमी शिक्षक यांचा उत्स्फूर्त सहभाग आहे.

ji24news
Author: ji24news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Panchang

Gold & Silver Price

Top News

Advertisement

Our Visitor

0 1 0 8 2 8
Total Users : 10828

Covid Update

जि.प.उच्च प्राथ.शाळा बांधण शाळेत अक्षरधारा फाउंडेशन ट्रस्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेतील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक शाहित्य.

आदिवासी हक्क संघर्ष समितीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न…

20 वर्षांपासून पुलाची प्रतीक्षा; हिरडपाडा ग्रामस्थांचा मतदान बहिष्काराचा इशारा.लेंडी नदीवरील कायमस्वरूपी पुलासाठी दोन दशकांचा संघर्ष; ८ हजार नागरिकांचा प्रश्न ऐरणीवर

अल्ट्रा चॅम्पियन ” विशाल वळवीच्या उत्कृष्ट कामगिरीचा आदिवासी बांधवांकडून सन्मान.

अतिवृष्टीमुळे सांबरपाड्याचा एकमेव रस्त्यावर दरड कोसळून; ग्रामस्थांची मोठी गैरसोय, आमदारांना दिलेल्या निवेदनानंतरही कार्यवाही नाही

विक्रमगड आठवडे बाजाराला भरभरून प्रतिसाद मात्र शौचालयाची असुविधा – जनतेसाठी मोठा प्रश्न ?

मोखाडा तालुक्यातील १० वी-१२ वी च्या विद्यार्थ्यांना आनंददायी परीक्षेसाठी वैशाली पाटील यांचे मार्गदर्शन.

रोमहर्षक सामन्यात के के किंग 11संघाची बाजी.

दुसऱ्या फ्रीस्टाईल स्केट कार्टींगच्या नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये मोखाडा तालुक्यातील गाडर भगिनींनी पटकवाले दोन गोल्ड व एक ब्रॉन्झ मेडल्स.

पालघर: एसटीच्या लहरी कारभारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात; परीक्षेलाही पोहोचण्यास होतोय उशीर