
कठीण परिस्थितीत शिक्षणाचा ध्यास घेऊन विधी (एल एल बी) पदवी पूर्ण…..
प्रतिनिधी-दीपक भोयेji24news
विक्रमगड
जव्हार तालुक्यातील पिपंळशेत गावच्या सौ.ललिता प्रदीप कामडी यांनी नुकत्याच झालेल्या विधी (एल एल बी) पदवी परीक्षा हि चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊन मौळे व कामडी कुटूंबा बरोबरच आदिवासी समाजाचे नाव केले आहे.
त्या १२ वी चे शिक्षण पूर्ण करत असताना वडिलांचे छत्रहरपले त्या नंतर घरात आई दोन लहान भाऊ यांसोबत कुटुंबाची जबाबदारी सांभाळत प्रतिकूल परिस्थितीवर खंबीरपणे मात करत काम करता करता मुक्त विद्यापीठ मधून बीए चे शिक्षण पूर्ण केले. काही वर्ष शिक्षणात खंड पडला पण शिक्षणाची जिद्द न सोडता विधी (एल एल बी) शिक्षणघेतले यादरम्यान गरोदरपणा आणि प्रस्तुती नंतर लहान बाळाची जबाबदारी सांभाळून विधी शिक्षण पूर्ण केलं यात त्यांना मोलाची साथ आई, भाऊ अजय मौळे, विजय मौळे, भाची साक्षी तसेच नवऱ्या बरोबरच सासू सासरे यांनी वेळोवेळी पाठीशी खंबीरपणे उभंराहून सहकार्य केले.
घराबाहेर पाऊल टाकताना उभी टाकलेली आव्हाने त्याच बरोबर कुटुंब आणि बाळ झाल्यावर आलेले पालकत्व तसेच करियर सांभाळताना होणारी भावनिक ओढाताण आणि येणारी आव्हाणे यावर मात करत कायद्याचे शिक्षण पूर्ण केले आहे. यामुळे आदिवासी दुर्गम ग्रामीण भागात लवकरच महिला वकील म्हणून नागरिकांना न्याय मिळवून देण्याचे काम त्यांच्या हातून घडणार आहे याचे सर्वच स्तरातून त्यांच्यावर कौतुकाचा व आशीर्वादाचा वर्षाव होत आहे
Total Users : 10829