
म्हसेपाडा येथील पिडित कुंटूबाचे सांत्वन—
वाडा ji24news.
नुकताच वाडा तालुक्यातील म्हसेपाडा येथील बालिकेचा गुरुवारी पायाभूत सुविधांअभावी वेळेत दवाखान्यात पोहचू न शकल्याने उपचाराआधीच मृत्यू ओढवला. विक्रमगड व वाडा हद्दीलगत असलेले म्हसेपाडा येथील लावण्या नितीन चव्हाण या एक महिना अठरा दिवस असलेल्या बालिकेचा रस्त्याच्या सुविधेअभावी तिला जीव गमवावा लागला.
स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतर ही याठिकाणी दळणवळणाची सुविधा अद्याप पोहोचली नसून ह्या ठिकाणी आज प्रत्यक्षात शाळेतील मुलांना शिक्षण घेण्यासाठी ये-जा करण्यासाठी लाकडी फळीचा वापर करुन जीव धोक्यात घालावा लागत आहे. विद्यार्थ्यांच्या मनात शिक्षणाची ओढ आहे. परंतु सोयी सुविधांच्या अभावामुळे त्यांना जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. हे शासकिय यंञणेचे दुर्दैव आहे.
पिडित कुंटूबाचे सांत्वन करण्यासाठी व विचारपूस करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते मिलिंद महाकाळ, आर्यन आदिवासी फांऊडेशनचे महाराष्ट्र राज्य सचिव संदीप महाकाळ, सदस्य रविंद्र घाटाळ, विक्रमगड तालुका उपाध्यक्ष भूषण महाकाळ, यतीन मिसाळ, गणेश टोपले, गावातील नागरिक चंद्रकांत ठाकरे, मंजुळा ठाकरे व मोठ्या संख्येने उपस्थित असलेले म्हसेपाडा येथील ग्रामस्थ आपल्या पायाभूत सुविधा व मुलभूत गरजांच्या पूर्ततेसाठी आतूरतेने प्रशासनाची वाट पाहत आहेत…
Total Users : 10829