
जव्हारमधील दाभोसा धबधबा ठरतो मृत्यूचे कारण
एक आठवडा मध्ये दोघांचा मृत्यू.
प्रतिनिधी-दीपक भोये विक्रमगड ji24news.
जव्हार हे मिनी महाबळेश्वर थंड हवेचे ठिकाण असून जव्हारची ओळख आहे .पावसाळा आला की ,जव्हार तालुका हा जगू काही नैसर्गिक द्रावरूप धारण करून जिकडेतिकडे हिरवेगार आणि धबधब्याचा धोडाड निसर्गाची किमया पाहायला मिळते.त्यातच या नैसर्गिक सुप्रसिद्ध असलेला दाभोसा धबधबा यांचा आनंद घेण्यासाठी रोजच मुंबई ,ठाणे,नाशिक,पालघर,गुजरात दादरा नगर हवेली या भागातील शेकडो पर्यटक या धबधब्यांना आवर्जून भेटी देतात त्यातच रविवारी सुट्टी असल्याने या धबधबा या ठिकाणी भयानक गर्दी होत असल्याने काही नागरिक या धबधबा चा आनंद घेण्यासाठी या मध्ये उडी मारून पोहण्याचा आनंद घेत असतात तर एकीकडे या चालू वर्षी २ नागरिक या धबधबा मध्ये बुढून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे गेल्या रविवारी एक दाभेरी ग्रामपंचायत पैकी होळीपाडा येथील नागरिक याचा यामध्ये मुर्त्यू झाला आहे आणि काल दिनांक १६ जुलै गेल्या ६ दिवसात एक भयानक घटना घडली आहे .मोखाडा मधील जोगलवाडी येथील एक युवा नागरिक हा पोहण्याचा आनंद घेत असताना त्यांचं वेळी पाऊस जास्त आल्याने या नागरिकांना बाहेर येत नव्हतं त्यामुळे त्यांचा मित्र देवेंद्र शिंदे याने थेट धबधबा मध्ये उडी मारून त्याचे मित्राला वाचवण्याचा प्रयत्न करत होता परंतु त्याला जास्त प्रमाणात हालचाल करत न आल्याने दुर्दैवाने त्या मित्रासाठी याला जीव द्यावा लागला.
Total Users : 10829