
डोळ्याच्या आजाराने नागरिक त्रस्त….
प्रा दिनेश राठोड ji24news जिल्हा प्रतिनिधी वर्धा
: पावसामुळे वातावरणात सुक्ष्म बदल होतात. बॅक्टेरिया किंवा व्हायरसमुळे आजाराची शक्यता बळावते. वर्धा जिल्ह्यात कंजंक्टिवायटिस (नेत्रश्लेष्मला) हा डोळ्यांचा आजार झाला. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. कंजंक्टिवायटिस हा संसर्ग सुक्ष्म जीवाणूंमुळे होतो. डोळ्यांची साथ होणारे रुग्ण सापडत कंजंक्टिवायटिस हा डोळ्यांच्या संसर्गामुळे पांढऱ्या भागावरती आणि पापणीच्या आतल्या बाजूस दाह संसर्गामुळे होतो. आजवर या आजाराच्या 200 पेक्षा अधिक रुग्णाची नोंद हिंगणघाट आरोग्य केंद्रात झाली आहे. त्यामुळे याबाबत नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन स्थानिक आरोग्य विभाग व डॉक्टर करीत आहे
हा आजार प्रामुख्याने एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे सहज पसरू शकतो. पण योग्य वेळेला निदान झाल्यास काही चिंता नाही. हा आजार फक्त शरीर संपर्काद्वारे आणि स्त्राव संपर्काद्वारे पसरू शकतो. कंजंक्टिवायटिस संबंधित काही लक्षणं दिसल्यास वेळीच आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधावा. ग्रामीण व शहरी आरोग्य केंद्रात जाऊन उपचार करावेत, असेही आवाहन वैद्यकीय अधिकारी हिंगणघाट यांनी केले आहे.
Total Users : 10829