ji24news

मोखाडा तालुक्यातील मुकुंदपाडावासीय भोगातायत जीवंतपणी मरणयातना…

मोखाडा तालुक्यातील मुकुंदपाडावासीय भोगातायत जीवंतपणी मरणयातना…

जोहार इंडिया 24 न्यूज – रामदास गाडर

मोखाडा : पालघर जिल्ह्याचे शेवटचे टोक म्हणजे मुकुंदपाडा. मुकुंदपाडा हे गाव मोखाडा तालुक्यातील ओसरविरा- बेरिस्ते ग्रुप-ग्रामपंचायतमध्ये स्थित असून भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवामध्ये सुद्धा मूलभूत सोयी सुविधांपासून वंचित आहे.
मुकुंदपाडावासिय शिक्षण आरोग्य रस्ते दळणवळण इ. इत्यादी मूलभूत सुविधा मिळवण्यासाठी आजही संघर्ष करत आहेत. घोडीपाडा आणि मुकुंदपाडा यांच्यामध्ये असलेल्या नदीवर कोणत्याही प्रकारचा पूल अथवा सांकव नसल्यामुळे नागरिकांना तालुक्याच्या ठिकाणी कार्यालयीन कामकाज,राशन तसेच आवश्यक शिधा आणणे तसेच आजारपणात दवाखान्याचे उपचार घेण्यासाठी नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या मूलभूत अडचणी सोडवण्यासाठी नागरिकांना पोहून नदी पार करावी लागते. नदी पार करत असताना अंगावरील कपडे हे प्लास्टिकच्या पिशवीमध्ये भरून ती पिशवी नदीच्या दुसऱ्या किनारापर्यंत जाऊन त्या किनाऱ्यावर कपडे परिधान करावे लागतात. तसेच शासनाकडून मिळत असलेले धान्य 10 कि.मी.आणावे लागते.आणलेले धान्य प्लास्टिकच्या गोणीमध्ये भरून ती गोणी पोहून घरापर्यंत आणावी लागते. या सर्व कसरतीमध्ये अनेकदा नागरिकांना जीव गमवावे लागले आहेत.
भारतीय स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर सुद्धा मुकुंदपाडावासीय मूलभूत गरजा भागवण्यासाठी प्रचंड संघर्ष करत असून याकरिता आपला जीव धोक्यात घालत आहेत. सध्या ते जिवंतपणीच मरण यातना भोगत असून त्यांच्या या मरण यातना कधी संपतील…? हा प्रश्न मात्र आजही अनुत्तरितच आहे.
त्यांच्या या मरण यातना कायमस्वरूपी संपवण्यासाठी आवश्यकता आहे ती म्हणजे लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या संवेदनशीलतेची प्रचंड इच्छाशक्तीची. येणाऱ्या काळात मुकुंदपाडावासियांच्या मूलभूत गरजांबाबत लोकप्रतिनिधी आणि प्रशासन किती संवेदनशीलता आणि तत्परता दाखवतात हे पाहणे औत्सुक्याचे आहे

ji24news
Author: ji24news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Panchang

Gold & Silver Price

Top News

Advertisement

Our Visitor

0 1 0 8 2 9
Total Users : 10829

Covid Update

जि.प.उच्च प्राथ.शाळा बांधण शाळेत अक्षरधारा फाउंडेशन ट्रस्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेतील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक शाहित्य.

आदिवासी हक्क संघर्ष समितीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न…

20 वर्षांपासून पुलाची प्रतीक्षा; हिरडपाडा ग्रामस्थांचा मतदान बहिष्काराचा इशारा.लेंडी नदीवरील कायमस्वरूपी पुलासाठी दोन दशकांचा संघर्ष; ८ हजार नागरिकांचा प्रश्न ऐरणीवर

अल्ट्रा चॅम्पियन ” विशाल वळवीच्या उत्कृष्ट कामगिरीचा आदिवासी बांधवांकडून सन्मान.

अतिवृष्टीमुळे सांबरपाड्याचा एकमेव रस्त्यावर दरड कोसळून; ग्रामस्थांची मोठी गैरसोय, आमदारांना दिलेल्या निवेदनानंतरही कार्यवाही नाही

विक्रमगड आठवडे बाजाराला भरभरून प्रतिसाद मात्र शौचालयाची असुविधा – जनतेसाठी मोठा प्रश्न ?

मोखाडा तालुक्यातील १० वी-१२ वी च्या विद्यार्थ्यांना आनंददायी परीक्षेसाठी वैशाली पाटील यांचे मार्गदर्शन.

रोमहर्षक सामन्यात के के किंग 11संघाची बाजी.

दुसऱ्या फ्रीस्टाईल स्केट कार्टींगच्या नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये मोखाडा तालुक्यातील गाडर भगिनींनी पटकवाले दोन गोल्ड व एक ब्रॉन्झ मेडल्स.

पालघर: एसटीच्या लहरी कारभारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात; परीक्षेलाही पोहोचण्यास होतोय उशीर