ji24news

वर्ध्यात 13 हजार 932 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान; नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी खासदार थेट बांधावर…

वर्ध्यात 13 हजार 932 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान; नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी खासदार थेट बांधावर

प्रा.दिनेश राठोड ji24news जिल्हा प्रतिनिधी वर्धा…

: वर्ध्यात (Wardha) झालेल्या मुसळधार पावसाने (Rain) शेकडो हेक्टरवरील पिकं खरडून गेली आहेत. तर शेतीची पाहणी करण्यासाठी खासदार रामदास तडस शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचले आहे.
बांधावर पोहचून त्यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. त्याचप्रमाणे त्यांनी शेतकऱ्यांशी देखील संवाद साधला आहे. राज्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
नदीकाठच्या गावांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत जाहीर करण्यात यावी अशी मागणी खासदार रामदास तडस यांनी केली आहे. तर जिल्हा प्रशासनाकडून देखील शेतकऱ्यांच्या शेताची पाहणी करण्यात आली आहे. कृषी विभागाच्या आकडेवारीमो तब्बल 13 हजार 932 हेकटर शेती क्षेत्रात पिकाचे नुकसान
अनेक गावांना पुराच्या पाण्याचा फटका
वर्धा, यशोदा, वणा, बोर आणि धाम या नद्या मुसळधार पावसामुळे दुधडी भरुन वाहत आहेत. तर यशोदा आणि वर्धा नदी काठावरील शेती पुराच्या पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात बाधित झाली आहे. जवळपास पाचशे बारा गावांमध्ये शेतीचे नुकसान झाले आहे. याचा सर्वाधिक फटका हिंगणाघाटाला बसला आहे. हिंगणघाट तालुक्यातील कान्होली, कुंभी, अलमडोह, पिंपळगाव, वाळदुर, मणसावळी, सेलू तालुक्यातील कोटंबा, कोलगाव, येळाकेळी, सरुळ या गावांना याचा चांगलाच फटका बसला आहे.
मागील चार दिवसांत जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे जवळपास 1659 हेक्टर इतक्या क्षेत्रात नुकसान झाले आहे. पण मागील 48 तासांत झालेल्या पावासामुळे यामध्ये आणखी भर पडल्याचं चित्र आहे. सध्या जिल्ह्यात 13 हजार 932 हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. पुराचा सर्वधिक फटका हिंगणघाट, समुद्रपूर, सेलू आणि देवळी तालुक्याला बसला आहे.
आधीच राज्यात मान्सूनने उशीरा हजेरी लावली होती. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पेरण्या देखील खोळंबल्या होत्या. त्यातच आता झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा अवकाळी संकट कोसळले आहे. त्यामुळे तातडीने पंचनामे करुन मदत करण्यात यावी अशी मागणी शेतकरी देखील करत आहेत. जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार पावासामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणवर नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांची शेती देखील खरडून गेली आहे. देवळी तालुक्यातील काही भागात खासदार रामदास तडस यांनी पाहणी केली. तसेच शासनाकडे शेतकऱ्यांना मदतीसाठीचा पाठपुरावा करणार असल्याचं आश्वासन त्यांनी यावेळी शेतकऱ्यांना केले आहे. तसेच संसदेत देखील हा मुद्दा उपस्थित करणार असल्याचं खासदार तडस यांनी सांगितले आहे.

ji24news
Author: ji24news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Panchang

Gold & Silver Price

Top News

Advertisement

Our Visitor

0 1 0 8 2 8
Total Users : 10828

Covid Update

जि.प.उच्च प्राथ.शाळा बांधण शाळेत अक्षरधारा फाउंडेशन ट्रस्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेतील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक शाहित्य.

आदिवासी हक्क संघर्ष समितीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न…

20 वर्षांपासून पुलाची प्रतीक्षा; हिरडपाडा ग्रामस्थांचा मतदान बहिष्काराचा इशारा.लेंडी नदीवरील कायमस्वरूपी पुलासाठी दोन दशकांचा संघर्ष; ८ हजार नागरिकांचा प्रश्न ऐरणीवर

अल्ट्रा चॅम्पियन ” विशाल वळवीच्या उत्कृष्ट कामगिरीचा आदिवासी बांधवांकडून सन्मान.

अतिवृष्टीमुळे सांबरपाड्याचा एकमेव रस्त्यावर दरड कोसळून; ग्रामस्थांची मोठी गैरसोय, आमदारांना दिलेल्या निवेदनानंतरही कार्यवाही नाही

विक्रमगड आठवडे बाजाराला भरभरून प्रतिसाद मात्र शौचालयाची असुविधा – जनतेसाठी मोठा प्रश्न ?

मोखाडा तालुक्यातील १० वी-१२ वी च्या विद्यार्थ्यांना आनंददायी परीक्षेसाठी वैशाली पाटील यांचे मार्गदर्शन.

रोमहर्षक सामन्यात के के किंग 11संघाची बाजी.

दुसऱ्या फ्रीस्टाईल स्केट कार्टींगच्या नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये मोखाडा तालुक्यातील गाडर भगिनींनी पटकवाले दोन गोल्ड व एक ब्रॉन्झ मेडल्स.

पालघर: एसटीच्या लहरी कारभारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात; परीक्षेलाही पोहोचण्यास होतोय उशीर