
आखिल भारतीय ग्रामीण डाक सेवक संघटनेचे धरणे आंदोलन देगलूर-
नांदेड जिल्हा प्रतिनिधी …सुनील मदनुरे.ji24news
अखिल भारतीय ग्रामीण डाक सेवक संघटनेचा संपूर्ण भारतात एक दिवसीय लक्षणीय धरणा कार्यक्रम करण्याचे संघटनेचे महासचिव कॉम्रेड एस.एस. महादेवय्या यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी शासनाला निवेदन देऊन धरणा कार्यक्रमाची हाक दिली होती. त्याप्रमाणे नांदेड विभागातील संघटनेच्या कर्मचाऱ्यांनी विभागीय कार्यालयावर धरणे आंदोलन केले. आपल्या विविध मागण्यासाठी अखिल भारतीय ग्रामीण डाक सेवक संघटना नांदेड डाक विभागीय कार्यालयासमोर कॉ. जी. व्ही. स्वामी प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र राज्य यांच्या नेतृत्वाखाली एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी ग्रामीण डाक सेवकांच्या विविध मागण्यांसंदर्भात डाक अधीक्षक राजीव पालेकर यांना निवेदन देण्यात आले. यावेळी जी.बी. भिलवंडे महाराष्ट्र कार्यकारनी सदस्य, नांदेड जिल्हा सचिव व्ही.एम. काळे,गाढे, अब्दुल रहीम पाशा पटेल, मुतेंमबागी, पावडे,पाटील शंकरराव, टेकाळे बालाजी, प्रकाश जाधव, साखरे वाघमारे अजय, शिंदे मॅडम, वाठोरे मॅडम सह डाक सेवक मोठया संख्येने उपस्थित होते… .
Total Users : 10828