
बिलोली राव धानोरा या बसला 8 ऑगस्ट रोजी साडेबारा वाजता पिंपळगाव फाट्यावर अपघात…
नांदेड जिल्हा प्रतिनिधी ji24news
बिलोली राव धानोरा या बसला 8 ऑगस्ट रोजी साडेबारा वाजता पिंपळगाव फाट्यावर अपघात झाला असून स्टेरिंग लॉक झाल्यामुळे सदर बसला अपघात झाला आहे बिलोली आगारातून दर दिवशी साडेअकरा वाजता निघणारी बस कुंडलवाडी पिंपळगाव कारखिले मार्गे राव धानोरा जाते नेहमीप्रमाणे आजही एसटी बसचे स्टेरिंग अचानक लॉक झाल्याने सदर मार्गावरून बस पलटी खाल्ली यामध्ये 68 पैकी 11 प्रवासी किरकोळ जखमी झाल्याची माहिती कुंडलवाडी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक नारायण शिंदे यांनी सांगितले बस चालक राजू भुजंग इलेवाड यांच्या फिर्यादीवरून घटनेची नोंद घेण्यात आली एम एच 20 बीएल 1903 असा बसचा क्रमांक आहे क्रमांक आहे प्रवाशांना समोरची काच फोडून बाहेर काढण्यात आली आहे ही माहिती कळताच बरेचसे लोक मदतीसाठी धावले .
Total Users : 10829