
पालघर/विक्रमगड .उल्हासराव भोईर प्राथ. व माध्यमिक आश्रमशाळा मान ता. विक्रमगड येथे शाळेतील सर्व १००० विद्यार्थ्यांना समाजकल्याण न्यास तर्फे कपडे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमप्रसंगी धर्मसेवक डॉ. सोन्या पाटील, मा. आमदार रुपेश म्हात्रे, प.अ.जाधव समाज उन्नती मंडळ चे अध्यक्ष विजय जाधव, तनुजा घोलप स.क.न्यास महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष, प्रकाश देवळीकर पालघर जिल्हा अध्यक्ष स.क.न्यास, सौ रेशमाताई पाटील, *सौ प्रतिभा गुरोडा कृषी सभापती, सौ. नम्रता गोवारी उपसभापती विक्रमगड तालुका, सचिन जगताप पी एस आय विक्रमगड, रवींद्र भोईर पालघर जिल्हा संपर्कप्रमुख स.क.न्यास, शाळेचे मुख्याध्यापक श्री पाटील सर, भरत जोघरी, सोमनाथ टोकरे,श्री रोहिदास शेलार, नरेश गोवारी, भूपेंद्र चातुर्य, मिलिंद महाकाळ, रवींद्र मेघा हे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
या कार्यक्रमात समाजकल्याण न्यास अध्यक्ष डॉ.श्री.सोन्या पाटील यांनी सोमनाथ टोकरे- आदिवासी आघाडी पालघर जिल्हा, नरेश गोवारी- आदिवासी आघाडी पालघर जिल्हा ग्रामीण निरीक्षक, भूपेंद्र चातुर्य- पालघर जिल्हा (ग्रा.)ओबीसी सेल, श्री कोंढारी- उपतालुका प्रमुख जव्हार, मिलिंद महाकाळ- विद्यार्थी आघाडी पालघर जिल्हा, रवींद्र मेढा- आदिवासी आघाडी विक्रमगड तालुका इत्यादी पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या व नियुक्ती पत्र दिले.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स.क.न्यास पालघर जिल्हा संपर्कप्रमुख रवींद्र भोईर यांनी विशेष परिश्रम घेतले.सदर सामाजिक काम केल्या बदल समाधान व्यक्त होत आहे .

Total Users : 10829