
माण आश्रमशाळेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा..
पालघर;- ji 24 news .
माण आश्रमशाळेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा द ग्लोबल व्हॉईस मार्फत ब्लू टायगर सामाजिक संस्था व श्वेतगंध फाऊंडेशन,डोंबिवली व परिवार सामाजिक संस्था ठाणे आयोजित महाराष्ट्र रत्नगौरव गुणिजन सत्कार सोहळा 2023 ठाणे येथे शनिवार दिनांक 12 ऑगस्ट 2023 सायंकाळी 3.30 वाजता सहयोग मंदिर हॉल,सहयोग मंदिर पथ, घंटाली,नौपाडा,ठाणे पश्चिम येथे अतिशय आनंदात,जल्लोषात व दिमाखात पार पडणार आहे.या कार्यक्रमात अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा माण,ता. विक्रमगड,जि.पालघर येथील माध्यमिक शिक्षक तसेच मोहो खुर्द गावचे सुपुत्र श्री.चेतन रमेश ठाकरे सरांना सुप्रसिद्ध अभिनेत्री मा.नयना आपटे यांच्या शुभहस्ते अतिशय मानाचा असा महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.आतापर्यंत संपूर्ण महाराष्ट्रातून तसेच गुजरात,गोवा या राज्यातून देखील त्यांना अनेक राज्यस्तरीय,आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.माण आश्रमशाळेसाठी ही अभिमानाची गोष्ट असून एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय जव्हार येथील प्रकल्प अधिकारी मा.श्रीमती नेहा भोसले मॅडम,आदिवासीं सेवा संस्थेचे सर्व पदाधिकरी,आदिवासी सेवा मंडळ मधील सर्व आश्रमशाळा,माण आश्रमशाळेचे माध्यमिक मुख्याध्यापक श्री.अरुण भोईर सर, प्राथमिक मुख्याध्यापक श्री.गिरिधर रिकामे सर तसेच माजी मुख्याध्यापक श्री.यशवंत वातास सर,सर्व शिक्षकवृंद,कर्मचारी वर्ग,विद्यार्थी व संपूर्ण पालघर जिल्ह्यामधून ठाकरे सरांचे विशेष कौतुक केले जात आहे.
Total Users : 10829