
श्री साईबाबा महाविद्यालयात डॉ. एस. आर. रंगनाथन जयंती…..
प्रा.दिनेश राठोड (ji24news) जिल्हा प्रतिनिधी – वर्धा
वडनेर : दिनांक १२ ऑगस्ट
श्री साईबाबा लोक प्रबोधन कला महाविद्यालय वडनेर ता.हिंगणघाट जिल्हा वर्धा येथे महाविद्यालयीन ग्रंथालयाच्या वतीने ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. एस. आर. रंगनाथन यांची जयंती साजरी करण्यात आली. डॉ. रंगनाथन यांच्या जयंतीनिमित्त ग्रंथालय दिन हा पुस्तकांना फ्रेंडशिप रिबीन बांधून साजरा करण्यात आला. प्रत्येकाने एका पुस्तकाला आपलं मित्र बनवून त्याच्याशी फ्रेंडशिप करावी आणि ते पुस्तक वाचावं यासाठी कादंबरी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असे प्रास्ताविकात कार्यक्रमाच्या समन्वयक व ग्रंथपाल डॉ. सारिका चौधरी यांनी सांगितले.
कादंबरी प्रदर्शनी मध्ये महाविद्यालयातील सर्व कादंबऱ्यांचे प्रदर्शन करण्यात आले. आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या प्रा. आरती देशमुख यांनी डॉ. रंगनाथन यांचे ग्रंथालय क्षेत्रातील मोलाचे योगदान आणि मनुष्य जीवनात ग्रंथालयाचा सहसंबंध कसा आहे हे आपल्या विचारातून उलगडून दाखविले. तसेच ग्रंथालयाशिवाय विद्यार्थीचे जीवन अपूर्ण आहे असे विचार त्यांनी मांडले. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. विनोद मुडे यांनी पुस्तकांचे आपल्या जीवनात असलेले महत्त्व त्याचप्रमाणे माझं शिक्षण माझी जबाबदारी स्वीकारून ग्रंथालयात येऊन विविध पुस्तकांशी मैत्री करून त्यांचे वाचन, मनन व चिंतन करण्याची नितांत गरज आहे असे विद्यार्थ्यांना त्यांनी भाषणातून सांगितले. कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Total Users : 10828