
इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात स्वातंत्र्यदिन साजरा.
प्रा.दिनेश राठोड ji24news जिल्हा प्रतिनिधी वर्धा.
स्थानिक वडनेर येथील
इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात महाविद्यालयात ७६ वा स्वातंत्र्यदिनी नूतन भारत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री के.टी.महाजन साहेब यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. प्रमुख अतिथी श्री महादेवराव महाजन,श्री अहमदखा पठाण हे होते तसेच प्राचार्या सौ.व्ही.सी खैरे उपस्थित होत्या. प्रसंगी विद्यार्थ्यांनी ‘मेरी मिट्टी मेरा देश’अभियानतर्गत वेशभूषा स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, वृक्षारोपण स्पर्धा नृत्य स्पर्धा, गितगायन स्पर्धा,शाहिदांना श्रद्धांजली अर्पण करण्याकरिता दीपप्रज्वलन इत्यादी कार्यक्रमात उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला
ध्वजारोहण कार्यक्रमाचे संचालन प्रा.श्री.दिनेश राठोड संचालक शारिरीक शिक्षण विभाग यांनी सांस्कृतिक कार्यक्रमाचे संचालन शिक्षक श्री ओंकार मडावी यांनी केले तर आभार प्रा.श्री छत्रपती दौलतकार यांनी मानले. याप्रसंगी इतर प्राध्यापक वृंद,शिक्षक वृंद शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद यांच्यासह असंख्य विद्यार्थी उपस्थित होते.
Total Users : 10828