
उपविभागीय अधिकारी साहेब
हिंगणघाट यांना विविध समस्या व मागण्यांसाठी निवेदन…
प्रा.दिनेश राठोड (ji24news) जिल्हा प्रतिनिधी – वर्धा…
हिंगणघाट तालुक्यातील वडणेर या गावाला तहसीलचा दर्जा मिळाला पाहिजे तसेच गावातील इतर समस्यांचे निराकरण झाले पाहिजे याबाबतीत उपविभागीय अधिकारी साहेब यांचेमार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा.श्री एकनाथ शिंदे साहेब यांना निवेदन देण्यात आले तसेच
परिसरातील वडनेर व पोहणा, गावातुन हायवे NH४४ जात आहे त्या हायवेवर सर्व्हिस रोडची कोणतीही व्यवस्था गावासाठी केलेली नाही, तसेच
वडनेर या गावात असलेल्या दोन स्मशानभूमीमध्ये शोकसभा शेड देण्यात यावा असे ही निवेदनात नमूद करण्यात आले,
वडनेर गावाला लागून जवळपास ३५ ते ४० खेडी आहेत परिसरातील सर्व लोकांना व विद्यार्थ्यांना रोज शेतीविषयक कागदपत्रे, शालेय शिक्षण विषयक कागदपत्रे खरेदी विक्री कागदपत्रे व इतर कागदपत्रे काढण्यासाठी वडणेर पासून 20 किलोमीटर अंतरावर असलेल्या तालुका स्थळ म्हणजे हिंगणघाटला जावे लागते, वडनेर हे मोठे गाव व बाजारपेठ असल्याने तहसीलचा दर्जा मिळाला पाहिजे,
गावातून जाणाऱ्या हायवेवर कोणतेही प्रकारचे स्ट्रीट लाईटची व्यवस्था करण्यात आलेली नाही, त्यामुळे गावातल्या लोकांना रात्री खूप अंधार असल्याने फार त्रास सहन करावा लागतो व अनेक जंगली श्वापदे व सरपटणारे प्राणी यांच्यापासून धोका संभवतो त्यामुळे दारोडा टोलनाक्यापासून ते आजनसरा चौफुली (संविधान चौक) पर्यन्त स्ट्रीट लाईट तात्काळ बसविण्यात यावे असेही निवेदनात नमूद केले आहे, वडनेर गावात जाण्यासाठी पुलाच्या खालून एक बोगदा दिलेला आहे त्याची उंची फार कमी आहे त्यामुळे कोणतेही प्रकारचे जड वाहन व गावातील वस्तीमध्ये जाऊ शकत नसल्याने व्यापारी व शेतकऱ्यांना खूप त्रास सहन करावा लागत आहे त्यासाठी ओपन पुलाच्या बांधकामाची मागणी केलेली आहे उपरोक्त विषयासंबंधी निवेदन देतांना
श्री गुरुदयालसिंग जुनी ग्रामपंचायत सदस्य वडनेर, राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष वर्धा, मा श्री प्रशांत भाऊ दरोडे, मा श्री नानाभाऊ माणिकपुरे, मा श्री विजुभाऊ लाटकर, मा श्री आकाश भाऊ अढाल, मा श्री निलेश भाऊ कुडमते, मा श्री राजूभाऊ सराटे, मा श्री विजुभाऊ पडोळे, मा श्री प्रशांतभाऊ राखुंडे ,मा श्री विक्रमभाऊ केराम, मा श्री साईल उईके, व इतर सदस्य राष्ट्रवादी काँग्रेस यांचेकडून निवेदन देण्यात आले प्रसंगीमोठ्या संख्येने गावकरी व शेतकरी उपस्थित होते.
Total Users : 10828