
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था झडपोली तर्फे शैक्षणिक साहित्याचे वाटप…
जोहार इंडिया 24 न्यूज
राजमाता जिजाऊ विकास प्रबोधन संस्था जव्हार संचलित छत्रपती शिवाजी विद्यानिकेतन खोच, ता.मोखाडा, जि.पालघर येथे गुरूवार दि.17 ऑगस्ट रोजी जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था झडपोली (विक्रमगड) संस्थेच्या माध्यमातून आदिवासी भागातील दारिद्र्य रेषेखालील गरीब मुलांना इ. 8 वी ते 12 वी पर्यंत च्या सर्व विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आल्या. त्यावेळी शाळेच्या सर्व शिक्षकांनी जिजाऊ संस्थेच्या पाहुण्यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. या कार्यक्रम प्रसंगी मा. सौ. हेमांगिताई पाटील – महिला सक्षमीकरण अध्यक्षा,
रोहित चक्रवती- युवा अध्यक्ष पालघर जिल्हा,जावेदभाई शेख – मोखाडा तालुका अध्यक्ष,कीर्ती भोईर – युवती अध्यक्षा महाराष्ट्र, महेश महाले – मोखाडा तालुका प्रमुख आणि संतोष गुंबाड – स्वयंसेवक पोशेरा जिल्हा परिषद गट जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था झडपोलीचे पदाधिकारी उपस्थित होते ; तर शिवाजी विद्यानिकेतन कला व वाणिज्य कनिष्ठ महविद्यालय खोच येथील श्री. कमलेश शिवराम पगार (मुख्याध्यापक)
उपशिक्षक – श्री.बाळू भरसट सर,श्री.गणेश कोर सर, श्री.गणपत हाके सर, श्री. अतुल जाधव सर, श्री. प्रविण खोडे सर ( लिपिक ) श्री. विष्णु भोये व श्री. यज्ञेश्वर अहिरे (शिपाई) इ.ची उपस्थिती होती.
Total Users : 10829