
रोटरी क्लब ऑफ पालघर तर्फे भव्य रक्तदान शिबीर संपन्न..
पालघरji24news.
आज 76 व्या स्वातंत्र्य दिना निमित्य रोटरी क्लब ऑफ पालघर, केळवा सागरी पोलीस ठाणे, इनर व्हील क्लब ऑफ पालघर, रोट्रॅक्ट क्लब पालघर व शितलादेवी-हनुमान मंदिर देवस्थान केळवे यांच्या तर्फे भव्य रक्तदान शिबीरात 576 रक्तदात्यानी रक्तदान केले. प्रत्येक रक्तदात्याला स्टीलची बॉटल भेटवस्तू म्हणून देण्यात आली तसेच रक्तदान शिबिरात पंचवीस संघानी रक्तदान केले त्यांना बॅट व फुटबॉल देण्यात आले. तसेच जे पी कॉलेज ऑफ फिजियोथेरेपी केळवा रोड चे 30 स्टुडन्ट सुद्धा होते. त्यांनी तिथे आलेल्या रुग्णांना फिजिओथेरपीची सेवा दिली. तसेच माननीय खासदार राजेंद्र गावित सरआणि पोलीस अधीक्षक मा. बाळासाहेब पाटील, रोटरी क्लब प्रेसिडेंट जयेश आव्हाड, सेक्रेटरी भूषण सावे, प्रोजेक्ट चेअरमन कल्पेश तांडेल संदीप किनी रक्तकर्ण रक्तदाता ग्रुपचे अध्यक्ष रक्तकर्ण प्रा किरण मंगला गजानन थोरात व रोटरी क्लबचे सर्व सभासद उपस्तिथ होते. सागरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भीमसेन गायकवाडसाहेब यांनी गावोगावी जाऊन रक्तदात्यांना आव्हान करण्यात प्रमुख भूमिका पार पाडली.

Total Users : 10829