वारंवार तक्रार करूनही मागणीकडे दुर्लक्ष

वेणी – जांगोणा बस वेळेवर सुरु करा – ग्रामस्थांची मागणी
वारंवार तक्रार करूनही मागणीकडे दुर्लक्ष
प्रा.दिनेश राठोड (ji24news) जिल्हा प्रतिनिधी – वर्धा
वडनेर : वेणी जांगोणा बस निश्चित वेळेत येत नसल्यामुळे शालेय विद्यार्थी तसेच ग्रामस्थांकडून संताप व्यक्त केल्या जात आहे. वेणी -जांगोणा गावातून दररोज विद्यार्थी शिक्षणासाठी तर गावकरी कामानिमित्त वडनेर व हिंगणघाट येथे बस ने ये – जा करत असतात. मात्र बसची योग्य वेळ नसल्याने सकाळ ची बस कधी 11:45 तर दुपारी 12 ला गावामध्ये पोहचते परिणामी विद्यार्थ्यांना शाळेत पोहचायला उशीर होतो परतीच्या वेळी देखील हिंगणघाट आगारातून उशिरा बस सुटल्याने मुलांना वडनेर स्थानकावर संध्याकाळी 7:30 ते 8 वाजेपर्यंत बसची वाट पाहत उपाशीपोटी ताटकळत बसावे लागते.बहुतेक विद्यार्थी वर्ग 10 मध्ये आणि 12 वी मध्ये शिक्षण घेत असल्याने त्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे.
याबाबत वारंवार तक्रार करून देखील ग्रामस्थांच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्या जात असल्याने बसची योग्य वेळ निश्चित न केल्यास आंदोलन करण्याचे इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
Total Users : 10829