
श्रमजीवी संघटनेच्या वतीने प्रलंबित मागण्यासाठी पंचायत समितीला घेरावा……
गटविकास अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर संघटनेकडून आंदोलन मागे
प्रतिनिधी ji24news-दीपक भोये.
विक्रमगड
पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यात पंचायत समिती व ग्रामपंचायत पातळीवर श्रमजीवी संघटनेच्या शिष्टमंडळाने ने बैठका घेऊन सुद्धा प्रश्न सुटले नव्हते अनेक मूलभूत प्रश्न जैसे थे असल्याने श्रमजीवी संघटनेच्या वतीने पंचायत समिती घेरावा घालून आंदोलन केले. पाणीपुरवठा, घरकुल योजना, तसेच ग्रामपंचायत मधील भ्रष्टाचाराचे मुद्दे इतर मागणे आंदोलकांच्या होते.
प्रतीक्षा यादीतील लाभार्थींना तात्काळ घरकुल देण्यात यावा तसेच पूर्ण झालेल्या घरकुलांचा त्यांच्या निधी लाभार्थीच्या खात्यावर वर्ग करावा. ग्रामपंचायत कार्यालयातील जमीन खरेदी घोटाळ्याचे चौकशी करण्यात यावी दोषीवर फौजदारी गुन्हा दाखल करावेत विक्रमगड तालुक्यातील जल जीवन मिशन अंतर्गत अपूर्ण पाणीपुरवठा तातडीने पूर्ण कराव्यात रोजगार हमी योजनेसाठी आधार कार्ड देऊन सुद्धा आधार कार्ड वारंवार मागितले जातात. अशा विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले होते. यावेळी शेकडो कार्यकर्ते ग्रामस्थ सहभागी असून उशिरा परत आंदोलन सुरच होते. अखेरी गटविकास अधिकारी यांनी आंदोलकांशी चर्चा करून संबंधित गोष्टीला न्याय दिला जाईल असे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले.
Total Users : 10829