ji24news

कृषिदुतांचे वृक्षरोपणाचा कार्यक्रम शेतकऱ्यांना शेती विषयी मार्गदर्शन…….


कृषिदुतांचे वृक्षरोपणाचा कार्यक्रम शेतकऱ्यांना शेती विषयी मार्गदर्शन…….

प्रतिनिधी ठाणे (अंबाडी)ji24news
डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली अंतर्गत यशोदीप सामाजिक विकास संस्था कराड, संचलित उद्यानविद्या महाविद्यालय सरळगाव ता.मुरबाड जि.ठाणे येथील कृषिदुतांचे ग्रामीण उद्यानविद्या कार्यानुभव निमित्ताने ग्राम कळमखांडे ता.मुरबाड जि.ठाणे येथे आगमन झाले त्यावेळी गावचे प्रथम नागरीक सरपंच भालचंद्र खोळंबे ,ग्रामसेवक लक्ष्मण घईवत, ग्रा.पं.सदस्य संध्याताई कापडी व नामदेव कापडी यांच्याकडून कृषिदूत- मयूर जाधव,मनिष भोसले, ऋषिकेश हाडे, अनिष पाटील, सुयश सूर्यवंशी व प्रज्वल प्रधान यांचे स्वागत करण्यात आले.
दि.१९/०८/२०२३ शनिवार रोजी, रावे कार्यक्रमा अंतर्गत कृषीदूतांकडून जि.प.प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना घेऊन वृक्षदिंडी काढून वृक्षरोपणाचा व वृक्षवाटप कार्यक्रम पार पाडण्यात आला त्या निम्मित महाविद्यालयाचे प्राचार्य एस. एन.जाधव व कार्यानुभव अधिकारी एस.पी.घुले यांचे मार्गदर्शन लाभले.
कृषिदुतांकडून येथील शेतकऱ्यांना विविध उपाययोजनांची माहिती देऊन योग्य उपाययोजनांचा प्रचार-प्रसार करण्यात आला.त्याचप्रमाणे विविध कार्यक्रमांचे आयोजन त्यांच्याकडून करण्यात आले.या ठिकाणातील महिलांना नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून कश्या प्रकारे विकसित शेती केली जाऊ शकते याबद्दल मोलाचे मार्गदर्शन कृषिदुतांकडून करण्यात आले.यावेळी सर्व महिलांना माती परीक्षणाचे धडे त्यांच्याकडून देण्यात आले असे विविध उपक्रम राबवून लोकांना जागृत करण्याचे काम या ठिकाणी करण्यात आले

ji24news
Author: ji24news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Panchang

Gold & Silver Price

Top News

Advertisement

Our Visitor

0 1 0 8 2 9
Total Users : 10829

Covid Update

जि.प.उच्च प्राथ.शाळा बांधण शाळेत अक्षरधारा फाउंडेशन ट्रस्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेतील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक शाहित्य.

आदिवासी हक्क संघर्ष समितीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न…

20 वर्षांपासून पुलाची प्रतीक्षा; हिरडपाडा ग्रामस्थांचा मतदान बहिष्काराचा इशारा.लेंडी नदीवरील कायमस्वरूपी पुलासाठी दोन दशकांचा संघर्ष; ८ हजार नागरिकांचा प्रश्न ऐरणीवर

अल्ट्रा चॅम्पियन ” विशाल वळवीच्या उत्कृष्ट कामगिरीचा आदिवासी बांधवांकडून सन्मान.

अतिवृष्टीमुळे सांबरपाड्याचा एकमेव रस्त्यावर दरड कोसळून; ग्रामस्थांची मोठी गैरसोय, आमदारांना दिलेल्या निवेदनानंतरही कार्यवाही नाही

विक्रमगड आठवडे बाजाराला भरभरून प्रतिसाद मात्र शौचालयाची असुविधा – जनतेसाठी मोठा प्रश्न ?

मोखाडा तालुक्यातील १० वी-१२ वी च्या विद्यार्थ्यांना आनंददायी परीक्षेसाठी वैशाली पाटील यांचे मार्गदर्शन.

रोमहर्षक सामन्यात के के किंग 11संघाची बाजी.

दुसऱ्या फ्रीस्टाईल स्केट कार्टींगच्या नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये मोखाडा तालुक्यातील गाडर भगिनींनी पटकवाले दोन गोल्ड व एक ब्रॉन्झ मेडल्स.

पालघर: एसटीच्या लहरी कारभारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात; परीक्षेलाही पोहोचण्यास होतोय उशीर