ji24news

परिवहन विभागाच्या शिबिरास उत्तम प्रतिसाद..

परिवहन विभागाच्या शिबिरास उत्तम प्रतिसाद…
प्रा.दिनेश राठोड (ji24news) जिल्हा प्रतिनिधी वर्धा

वर्धा: जिल्हा सामान्य रुग्णालयात जिल्ह्यातील प्रवासी बस चालकांसाठी नेत्र व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराला दुसऱ्या दिवशी देखील उत्तम प्रतिसाद लाभला.
दुसऱ्या दिवशी जिल्हाभरातील 167 चालकांनी आपली नेत्र व आरोग्य तपासणी करून घेतली.

उप प्रादेशिक परिवहन कार्यालय व जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने शिबिर घेण्यात आले आहे. सद्यस्थितीत राज्यात होणाऱ्या गंभीर अपघातात बसेसच्या अपघातामध्ये होणारी जीवितहानी सर्वाधिक आहे. चालकाचे संपूर्ण आरोग्य तसेच वाहन चालकाच्यादृष्टीस अनन्यसाधारण महत्त्व आहे. चालकाला कुठल्याही प्रकारची व्याधी असेल तर वाहन चालविताना अडचणी निर्माण होतात, परिणामी अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अपघात टाळण्यासाठी जिल्ह्यात सर्व प्रकारच्या बस चालकांची नेत्र व आरोग्य तपासणी केली जात आहे. दृष्टीदोष असणाऱ्या बॅच धारक चालकांना निशुल्क चष्म्याचे वितरण केले जाणार आहे.

शिबिराच्या दुसऱ्या दिवशी 167 वाहन चालकांची तपासणी करण्यात आली. या शिबिराचे कामकाज डॉ. खुबनानी यांच्या नेतृत्वात करण्यात आले. नेत्र चिकित्सा तपासणी करण्याकरिता डॉ.मनोज सक्तेपार यांच्या मार्गदर्शनात अनिल वरघट, अश्विनी गावंडे, किशोर मेश्राम व प्रफुल काकडे यांनी काम पाहिले तर एनसीडी विभागात डॉ. माधुरी निमसटकर यांच्या मार्गदर्शनात गीता लाडे, मंजुषा पाटील, मितला गोहाडे माधुरी लोखंडे, अश्विनी आसुटकर, वैशाली साबळे, सुकांत येसनकर, कृष्णा ताटे यांनी काम पाहिले.

ji24news
Author: ji24news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Panchang

Gold & Silver Price

Top News

Advertisement

Our Visitor

0 1 0 8 2 9
Total Users : 10829

Covid Update

जि.प.उच्च प्राथ.शाळा बांधण शाळेत अक्षरधारा फाउंडेशन ट्रस्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेतील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक शाहित्य.

आदिवासी हक्क संघर्ष समितीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न…

20 वर्षांपासून पुलाची प्रतीक्षा; हिरडपाडा ग्रामस्थांचा मतदान बहिष्काराचा इशारा.लेंडी नदीवरील कायमस्वरूपी पुलासाठी दोन दशकांचा संघर्ष; ८ हजार नागरिकांचा प्रश्न ऐरणीवर

अल्ट्रा चॅम्पियन ” विशाल वळवीच्या उत्कृष्ट कामगिरीचा आदिवासी बांधवांकडून सन्मान.

अतिवृष्टीमुळे सांबरपाड्याचा एकमेव रस्त्यावर दरड कोसळून; ग्रामस्थांची मोठी गैरसोय, आमदारांना दिलेल्या निवेदनानंतरही कार्यवाही नाही

विक्रमगड आठवडे बाजाराला भरभरून प्रतिसाद मात्र शौचालयाची असुविधा – जनतेसाठी मोठा प्रश्न ?

मोखाडा तालुक्यातील १० वी-१२ वी च्या विद्यार्थ्यांना आनंददायी परीक्षेसाठी वैशाली पाटील यांचे मार्गदर्शन.

रोमहर्षक सामन्यात के के किंग 11संघाची बाजी.

दुसऱ्या फ्रीस्टाईल स्केट कार्टींगच्या नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये मोखाडा तालुक्यातील गाडर भगिनींनी पटकवाले दोन गोल्ड व एक ब्रॉन्झ मेडल्स.

पालघर: एसटीच्या लहरी कारभारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात; परीक्षेलाही पोहोचण्यास होतोय उशीर