
आदिवासी मधून ख्रिचन धर्म स्वीकारणाऱ्या नागरिकांना आदिवासींच्या सर्व योजना बंद…
प्रतिनिधी ji24news-दीपक भोये विक्रमगड
दि.३१/०८/२०२३. विक्रमगड तालुक्यातील खुडेद ग्रामपंचायत ची ग्रामसभा नुकतीच पार पडली.सदर सभेत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली .तसेच मागील विकास कामांचा आढावा घेण्यात आला. सन २०१४ साली ठाणे जिल्ह्याचे विभाजन होऊन पालघर हा आदिवासी जिल्हा म्हणून पूर्णपणे स्वतंत्र जिल्हा करण्यात आला.पालघर जिल्हा हा पेसा कायदा अंतर्गत येत असल्याने पेसा कायदा मध्ये आदिवासी संस्कृती,परंपरा जोपासणे आणि संवर्धन करणे अशी तरतूद नमूद आहे.तसेच हा जिल्हा पूर्णपणे डोंगराळ भागात असून येथील ९५% नागरिक आदिवासी समाजातील आहेत.ग्रामपंचायत खुडेद हद्दीतील याच आदिवासी समाजाचे काही लोक ख्रिचन धर्म स्वीकारत असल्याचे आढळून आले आहे.ही लोकं आदिवासींची संस्कृती, परंपरा जोपासणे नाकारू लागली आहेत त्यामुळे आदिवासी संस्कृती, परंपरा यांचा ऱ्हास आणि आदिवासी समाजात तेढ निर्माण होत असल्याचे सामाजिक कार्यकर्ता संदीप पाटारा व ग्रामपंचायत हद्दीतील ग्रामस्थ मिळून ग्रामपंचायत कार्यालय येथे अर्ज सादर करून सदर विषयावर ग्रामसभेत चर्चा करण्याची मागणी केली होती.त्या अनुसंगाने सदर विषय चर्चेत आणि प्रोसेडिंगला घेण्यात आला.या विषयावर ग्रामसभेत जोरदार चर्चा करण्यात आली .जी लोकं आदिवासींची संस्कृती, परंपरा जोपासणे नाकारत आहेत .वाघ देव,तोरण देव,कोवळी भाजी,खादीचा देव, बारशी देव, सातीचा देव, रवाळ देव, गावदेव, गावकीचे जागरण,वाडी देव अशी आदिवासींची संस्कृती, परंपरा बुडवून ख्रिचन धर्म स्वीकारत आहेत. त्यामुळे ती लोकं आदिवासी समाजातील घटक आहेत असे मानता येणार नाही.तसेच लग्न विधी,मृत्यू विधी याच्यात देखील बदल करीत आहेत .तसेच बेकायदेशीररित्या जी लोकं इतर धर्माची प्रार्थना शिबिरे चालवीत आहेत अशा लोकांना ग्रामपंचायत कडून रीतसर नोटीस पाठवून कायदेशीर कारवाई करावी अशी चर्चा करण्यात आली.तसेच खुडेद ग्रामपंचायत हद्दीतील जे नागरिक ख्रिचन धर्म स्वीकारतील त्यांना या पुढे कोणत्याही आदिवासी विकास योजनेचा लाभ घेता येणार नाही.त्यांच्याकडे आता पर्यंत सगळी कागद पत्रे आदिवासींच्या नावाने असून खुडेद ग्रामपंचायत चे नवनिर्वाचित सरपंच लहू नडगे यांनी स्पष्ट सांगितले की यापुढे अशा लोकांनी जातीचा दाखला असेल किंवा इतर सगळी कागद पत्रे ही ख्रिचन धर्म मध्ये करून घ्यावी आणि यापुढे अशा नागरिकांना आदिवासी नावाने कोणताही लाभ घेता येणार नाही.ग्रामसभेत अशा प्रकारचा निर्णय घेऊन एक मुखाने, सर्वानुमते ठराव करण्यात आला .सदर विषयावरील ठरावाचे सर्व ग्रामस्थांनी स्वागत केले.
सदर ग्रामसभा नवनिर्वाचित सरपंच लहू नडगे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.सभेत माजी सरपंच कुसुम म्हसे,ग्रामविकास अधिकारी सुभाष कोम,पोलीस पाटील शांती सातपुते,तंटामुक्ती अध्यक्ष तुकाराम पांढरा,धर्म जागरण चे कार्यकर्ते संदिप पाटारा,वारकरी संप्रदाय चे अनिल डोके, दामा टोकरे, पांडुरंग कुवरा, धरतरी फाऊंडेशन चे कार्यकर्ते भारत पाटारा तसेच ग्रामपंचायत चे सर्व सदस्य व मोठ्या संख्येने ग्रामस्थ बंधू, भगिनी उपस्थित होते.

Total Users : 10829