
खो-खो स्पर्धेत इंदिरा गांधी कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुलींच्या संघाची जिल्हास्तरावर झेप..
प्रा.दिनेश राठोड (ji24news) जिल्हा प्रतिनिधी- वर्धा
वर्धा : जिल्हा क्रीडा कार्यालयातर्फे आयोजित १९ वर्षांखालील मुलींच्या तालुकास्तरावरील आंतरशालेय खो-खो स्पर्धेत इंदिरा गांधी कला व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाला आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करीत हिंगणघाटच्या नामांकित डॉ.बाबासाहेब आंबेडकर कनिष्ठ महाविद्यालयाच्या संघाचा पराभव करून एकतर्फी विजय मिळवला. व ही स्पर्धा जिकून वर्धा येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय खो खो स्पर्धेत प्रवेश मिळविला
आणि आपले वर्चस्व सिद्ध केले.विशेष म्हणजे मागील अनेक वर्षांपासून या कनिष्ठ महाविद्यालयीन संघ सातत्याने जिंकत असून दरवर्षीचं जिल्हास्तरावर झेप घेत आहे
या स्पर्धेचे आयोजन 4 सप्टेंबर रोजी संजय गांधी विद्यालय हिंगणघाट येथे करण्यात आले होते. या आधीही या कनिष्ठ महाविद्यालयाच्या संघाने विभागाचेही प्रतिनिधित्व केले होते. या संघाचे प्रतिनिधित्व
कु मयुरी मिलमिले कु सानिका वानखेडे कु विद्या सोयाम कु योगिता नखाते कु वैष्णवी तोडासे कु.मुस्कान सिंग कु. अनुष्का घुमे कु.खुशाली गोहने कु.खेतीका बोंडे कु.आरुषी देशमुख कु.विशाखा मोहुर्ले आदींनी केले सर्वांची मोलाची साथ लाभली.
संघाच्या विजयाबद्दल नूतन भारत शिक्षण संस्था वडणेरचे अध्यक्ष श्री कृष्णाजी महाजन साहेब,
संस्थेच्या व्यवस्थापिका सौ.संगीताताई महाजन कॉलेजच्या प्राचार्या सौ वंदना खैरे मॅडम, क्रीडा प्रमुख प्रा.दिनेश राठोड क्रीडा सहप्रमुख प्रा.स्मिता ठवळे तसेच इतर प्राध्यापकवृंद,शिक्षकवृंद, व शिक्षकेतर कर्मचारीवृंद आदी मान्यवरांनी खेळाडूंचे अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
Total Users : 10829