ji24news

*मा. आमदार भारती साहेब यांच्या निधीतून जि.प.सावर्डे शाळेला कॉम्पुटर, बॅटरी किबॉर्ड इत्यादी साहित्य देण्यात आले.

*मा. आमदार भारती साहेब यांच्या निधीतून जि.प.सावर्डे शाळेला कॉम्पुटर, बॅटरी किबॉर्ड इत्यादी साहित्य देण्यात आले.
*पालघर :सौरभ कामडी *

जिल्हा परिषद शाळा सावर्डे येथे मा. आमदार भारती साहेब यांच्या निधीतून शाळेला कॉम्पुटर, बॅटरी किबॉर्ड इत्यादी साहित्य देण्यात आले.सामाजिक कार्यकर्ते मिलिंद झोले यांच्या प्रयत्नामळे आज शाळेला कॉम्पुटर संच मिळाला.ह्या संचा मुळे शाळेतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवण्यासाठी तसेच उपस्थिती वाढवण्यासाठी व ऑनलाईन काम करण्यासाठी या कॉम्प्युटर संचाचा खूप उपयोग होणार असून, पहिली ते पाचवी पट 42 असून एकच शिक्षक असल्यामुळे या ऑल-इन-वन कॉम्प्युटरचा उपयोग विद्यार्थ्यांना शालेय उपक्रम ,शालेय अभ्यास शिकवण्यासाठी अतिशय उपयुक्त असून, एक शिक्षकाचे काम हे ऑल इन कॉम्प्युटर करणार आहे .असे शाळेचे मुख्याध्यापक संतोष बोंद्रे यांनी सांगितले. सावर्डे गावचे माजी सरपंच ,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष हनुमान पादीर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. तसेच मोखाडा तालुक्यातील विभाग शिक्षण विस्तार अधिकारी अनिल कडू यांचे सेवानिवृत्ती समारंभ सावर्डे शाळेत आयोजित केला होता. कडू यानी आपले तीस-पस्तीस वर्षे सेवा करत असताना अतिषय प्रामाणिकपणे शालेय शिक्षण विभागात काम केले ,सावर्डे शाळेला सतत भेट देऊन मार्गदर्शन करत असत, त्यामुळे मुख्याध्यापक संतोष बोंद्रे यांनी सेवानिवृत्ती समारंभाचा कार्यक्रम आयोजित केला होता. गावचे सरपंच व ग्रामस्थांनी यावेळी अनिल कडू यांचं शाल व श्रीफळ देऊन स्वागत केलं.तसेच सर्व ग्रामस्थांनी मुख्याध्यापक संतोष बोंद्रे यांनी मा.आमदार श्रीकांत भारतीय साहेब यांचे व मिलिंद झोले यांचे आभार मानले.

ji24news
Author: ji24news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Panchang

Gold & Silver Price

Top News

Advertisement

Our Visitor

0 1 0 8 2 9
Total Users : 10829

Covid Update

जि.प.उच्च प्राथ.शाळा बांधण शाळेत अक्षरधारा फाउंडेशन ट्रस्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेतील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक शाहित्य.

आदिवासी हक्क संघर्ष समितीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न…

20 वर्षांपासून पुलाची प्रतीक्षा; हिरडपाडा ग्रामस्थांचा मतदान बहिष्काराचा इशारा.लेंडी नदीवरील कायमस्वरूपी पुलासाठी दोन दशकांचा संघर्ष; ८ हजार नागरिकांचा प्रश्न ऐरणीवर

अल्ट्रा चॅम्पियन ” विशाल वळवीच्या उत्कृष्ट कामगिरीचा आदिवासी बांधवांकडून सन्मान.

अतिवृष्टीमुळे सांबरपाड्याचा एकमेव रस्त्यावर दरड कोसळून; ग्रामस्थांची मोठी गैरसोय, आमदारांना दिलेल्या निवेदनानंतरही कार्यवाही नाही

विक्रमगड आठवडे बाजाराला भरभरून प्रतिसाद मात्र शौचालयाची असुविधा – जनतेसाठी मोठा प्रश्न ?

मोखाडा तालुक्यातील १० वी-१२ वी च्या विद्यार्थ्यांना आनंददायी परीक्षेसाठी वैशाली पाटील यांचे मार्गदर्शन.

रोमहर्षक सामन्यात के के किंग 11संघाची बाजी.

दुसऱ्या फ्रीस्टाईल स्केट कार्टींगच्या नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये मोखाडा तालुक्यातील गाडर भगिनींनी पटकवाले दोन गोल्ड व एक ब्रॉन्झ मेडल्स.

पालघर: एसटीच्या लहरी कारभारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात; परीक्षेलाही पोहोचण्यास होतोय उशीर