ji24news

इंदिरा गांधी विद्यालयात शिक्षक दिन उत्साहात साजरा..

इंदिरा गांधी विद्यालयात शिक्षक दिन उत्साहात साजरा

प्रा.दिनेश राठोड ji24news जिल्हा प्रतिनिधी – वर्धा

वर्धा : डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त देशभर विविध कार्यक्रम साजरे होत असतानाच इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालय व कला वाणिज्य कानिष्ठ महाविद्यालय वडणेर ता. हिंगणघाट जि.वर्धा येथे शालेय विद्यार्थानी शाळेतील शिक्षकांचा पुस्तक, फुले आणि पेढा भरवून सत्कार करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांंनी शिक्षकांबद्दल आदराची भावना व्यक्त करणारी मनोगते सादर केली. शिक्षकांवर तयार केलेल्या कविता सादर केल्या. शिक्षकांनी डॉ. राधाकृष्णन यांची माहिती मुलांना सांगून आपल्या शिक्षकांचे स्मरण केले. त्यानंतर
शिक्षक बनलेल्या विद्यार्थ्यांनी परिपाठापासून ते सर्व तासिका शिकवण्याचे काम केले.
अशाप्रकारे मुलांनी शिक्षक दिन साजरा केला. शिक्षक झालेल्या विद्यार्थांनी शेवटी असे सांगितले की शिक्षकी पेशा हा पवित्र असून त्यात समाधान आणि आनंद आहे. पण कष्ट तेवढेच करावे लागतात. लहान मुलांना शिकवणे अवघड काम आहे. आमचे शिक्षक हे अवघड काम करत आहेत. आम्हाला आमचे बालपण जगण्याची संधी मिळाली, असे शिक्षकांनी सांगितले.याप्रसंगी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्राचार्या व्ही सी खैरे यांनी भूषविले तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.शरद ढाले उपस्थित होते कार्यक्रमाचे नियोजन प्रा.प्रणाली दोड आणि प्रा.स्मिता ठवले यांनी केले व सूत्रसंचालन वर्ग 9 वी व 10 च्या विद्यार्थ्यांनी केले या कार्यक्रमात इतर प्राध्यापकवृंद शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारीवृंद व असंख्य विद्यार्थी उपस्थित होते.

ji24news
Author: ji24news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Panchang

Gold & Silver Price

Top News

Advertisement

Our Visitor

0 1 0 8 2 9
Total Users : 10829

Covid Update

जि.प.उच्च प्राथ.शाळा बांधण शाळेत अक्षरधारा फाउंडेशन ट्रस्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेतील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक शाहित्य.

आदिवासी हक्क संघर्ष समितीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न…

20 वर्षांपासून पुलाची प्रतीक्षा; हिरडपाडा ग्रामस्थांचा मतदान बहिष्काराचा इशारा.लेंडी नदीवरील कायमस्वरूपी पुलासाठी दोन दशकांचा संघर्ष; ८ हजार नागरिकांचा प्रश्न ऐरणीवर

अल्ट्रा चॅम्पियन ” विशाल वळवीच्या उत्कृष्ट कामगिरीचा आदिवासी बांधवांकडून सन्मान.

अतिवृष्टीमुळे सांबरपाड्याचा एकमेव रस्त्यावर दरड कोसळून; ग्रामस्थांची मोठी गैरसोय, आमदारांना दिलेल्या निवेदनानंतरही कार्यवाही नाही

विक्रमगड आठवडे बाजाराला भरभरून प्रतिसाद मात्र शौचालयाची असुविधा – जनतेसाठी मोठा प्रश्न ?

मोखाडा तालुक्यातील १० वी-१२ वी च्या विद्यार्थ्यांना आनंददायी परीक्षेसाठी वैशाली पाटील यांचे मार्गदर्शन.

रोमहर्षक सामन्यात के के किंग 11संघाची बाजी.

दुसऱ्या फ्रीस्टाईल स्केट कार्टींगच्या नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये मोखाडा तालुक्यातील गाडर भगिनींनी पटकवाले दोन गोल्ड व एक ब्रॉन्झ मेडल्स.

पालघर: एसटीच्या लहरी कारभारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात; परीक्षेलाही पोहोचण्यास होतोय उशीर