
त्रंबकेश्वर नगरीत बम बम बोले जयघोष
प्रतिनिधी-ji24news जयवंत हागोटे त्रंबकेश्वर
त्र्यंबकेश्वर मध्ये तिसऱ्या श्रावण सोमवारच्या दिवशी पहाटेपासूनच त्र्यंबकेश्वर मध्ये गर्दी झाली होती हर हर महादेव आणि बम बम भोले चा जयघोष करत भाविक ब्रह्मगिरीला प्रदक्षिणा घालण्यास सुरुवात झाली होती भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता शहरात पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला होता ठीक ठिकाणी बॅरिगेट्स लावून वाहनांना बंदी घालण्यात आली होती भाविकांची गर्दी लक्षात घेऊन राज्य परिवहन महामंडळाने जादा बसेस सोडण्यात आल्या होत्या ब्रह्मगिरीचा रस्ता भाविकांच्या गर्दीत दुमदुमून गेला होता रस्त्या रस्त्यांवर दान सुरांकडून केळी, फराळाचे पदार्थ, चहा वाटप करण्यात आले तिसऱ्या श्रावणी सोमवारी ब्रह्मगिरी प्रदक्षिणा घालण्याची प्रथा अनेक वर्षापासूनचीच आहे ब्रह्मगिरीची प्रदर्शना म्हणजे जणू निसर्गाची आनंदयाचाच संतश्रेष्ठ निवृत्तीनाथांनी प्रथम ब्रह्मगिरीची फेरी मारल्याची आख्यायिका सांगितली जाते संपूर्ण श्रावण महिन्यात त्रंबक राजाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी बघायला मिळते त्यातही सोमवारच्या दिवशी लक्षणे गर्दी असते.
Total Users : 10828