
मुक्तांगण स्कूल नंदोरीने आरोग्य रक्षणाची बांधली गाठ
प्रा. दिनेश राठोड (ji24news) जिल्हा प्रतिनिधी – वर्धा
जिल्ह्यातील हिंगणघाट येथील नामांकित मुक्तांगण स्कूल नंदोरी येथे रक्षाबंधनच्या पवित्र पर्वावरआरोग्याचे रक्षण करणारे सर्व आरोग्य विभागातील कर्मचारी यांचे धन्यवाद मानत सर्व विद्यार्थ्यांनी व कर्मचाऱ्यांनी रुग्णांसोबत रक्षाबंधनाचा कार्यक्रम साजरा केला. आरोग्य विभाग नेहमीच स्वास्थ्याचे रक्षण करतो याप्रती ऋणाईत होऊन विद्यार्थ्यांनी स्वरचित राखी आरोग्य कर्मचाऱ्यांना बांधून समाजाप्रती आपली निष्ठा व्यक्त केली. या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बन, अंजू मिस, प्रणिता मिस इतर शिक्षिका उपस्थित होत्या.
Total Users : 10828