
तीज उत्सवात झाले बंजारा संस्कृतिचे दर्शन….
प्रा.दिनेश राठोड (ji24news) जिल्हा प्रतिनिधी वर्धा.
: बंजारा परंपरेतील सर्वात महत्वाचा असलेला तिज उत्सव वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे उत्साहात साजरा करण्यात आला.भारतीय संस्कृतीत प्रत्येक जाती धर्मातील विविध उत्सव वेगळ्या ढंगाने व परंपरेने साजरे केले जातात. त्यामुळेच आपल्या देशातील विविधतेत एकता दिसून येते. इसवी सन पूर्वपासून बंजारा समाजात चालत आलेला सर्वात महत्वाचा तीज उत्सव हिंगणघाट,समुद्रपूर तांड्याचे नायक श्री बळीराम चव्हाण आणि कारभारी श्री उल्हास राठोड यांच्या नैतृत्वात संत कँवरराम भवन येथे शेकडो समाजबांधवांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाची सुरुवात जगद्गुरू संत श्री सेवालाल महाराज व मरियामा आईच्या तसेच गणगौरींच्या प्रतिमेचे पूजनाणे करण्यात आली या कार्यक्रमाचे अध्यक्ष नायक श्री बळीराम चव्हाण व कारभारी श्री उल्हास राठोड हे होते तसेच प्रमुख पाहुणे म्हणून श्री प्रकाश राठोड,श्री संतोष जाधव श्री आकाश राठोड व श्री अविनाश राठोड यांना आमंत्रित करण्यात आले होते या
कधीकाळी डोंगरदऱ्यात राहणाऱ्या बंजारा समाजात तीज म्हणजे आनंदाची पर्वणीच असते. श्रावण महिन्यात ठिकठिकाणी बंजारा तांड्यांवर तिज उत्सवाची पाहायला मिळतो. सध्या तीज उत्सवाच्या बंजारा लोकगीतांनी तिथल्या लोकांवर चांगलच गारुड घातलं आहे. पारंपारिक वेशभूषेत फेर धरून नाचणाऱ्या महिला मुली सहभागी झाल्या. डोंगरदऱ्यात राहणाऱ्या बंजारा समाजाने आपली वेगळी परंपरा,लोकसंस्कृती आणि वेगळेपण जपल्याचे यानिमित्ताने दिसून आले.
महिला प्रधान संस्कृतीचे दर्शन घडवणारा हा उत्सव मातृ शक्तीला वंदन करणारा असून, आद्यगण “गण गौर” यांचे महत्व विशद करणारा आहे. सालाबाद प्रमाणे यंदाही हा कार्यक्रम आयोजित केला जातो. यावेळी मोठया प्रमाणात बंजारा बांधव आणि भगिनी या उत्सवाला उपस्थित हाेत्या.
या सणाला ‘गौरी’स्वरूप धान घेऊन तांड्याला प्रदक्षिणा घालतात
तिज हा उत्सव म्हणजे बंजारा समाजाची दिवाळीच. तिज म्हणजे बंजारा समाजाच्या लोक संस्कृतीचे सर्व पदर आणि पैलू उलगडणारा उत्सव. या उत्सवात दहा दिवसाआधी अविवाहित मुली एका टोपलीत ‘गौरी स्वरूप’ धान (गहू) पेरतात, रोज त्याला पाणी घालून बोलीभाषेत आराध्य देवतांची गीते म्हटली जातात. विसर्जनाच्या दिवशी डोक्यावर ‘गौरी’स्वरूप धान घेऊन वाजत गाजत तांड्याला प्रदक्षिणा केली जाते. लग्न होऊन सासरी गेलेल्या मुली, महिला तिज उत्सवाच्या निमित्याने माहेरी येतत. त्यामुळे या उत्सवाला वेगळे महत्त्व आहे.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री सुरेश चव्हाण यांनी केले व आभार प्रदर्शन प्रा.दिनेश राठोड यांनी केले,
Total Users : 10829