
महेश ज्ञानपीठ स्कुलच्या खेळाडूंची फुटबॉल स्पर्धेत राज्यस्तरावर झेप
प्रा.दिनेश राठोड (ji24news)
जिल्हा प्रतिनिधी -वर्धा
वर्धा : दिं.12/09/2023 ला जिल्हा क्रिडा संकुल वर्धा येधे झालेल्या जिल्हास्तरीय फ़ुटबॉल सामन्यामध्ये महेश ज्ञानपीठ स्कुलने न्यू इंग्लिश हायस्कुल वर्धा च्या फुटबॉल संघाचा पराभव करून दणदणीत विजय मिळविला,विशेष म्हणजे मागील ५ वर्षांपासून महेश ज्ञानपीठ स्कुल चा संघ जिल्हास्तरावर जिंकत आला असून राज्यसरावर झेप घेत आहे,विजयी संघात
१) सालेहा बक्श २) समृद्धी खाटिक ३)अधिका बाभूळकर ४) गायत्री भुजाडे ५) प्रतिक्षा पंडित
६) दिव्या धात्रक ७)कुंजल अध्याय ८) आर्य सूर्स
९) तेजस्वी बावनकर
१०)श्रुती महाकाळकर ११) खुशी सोलंकी १२) मनस्वी गलांडे
१३) पल्लवी ठाकरे १४)आर्या अडेपवार
१५) स्वराली निमजे १६) श्वेता कामडी
१७)संस्कृती आत्राम आदींच्या
फुटबॉल संघाने हा सामना जिंकल्यामुळे त्यांची विभागिय स्पर्धेकरीता निवड झालेली आहे. झालेल्या निवडी बद्दल त्यानी या विजयाचे श्रेय शाळा संचालक मंडळाचे अध्यक्ष गिरधरबाबु राठी, प्राचार्या वैशाली पोळ मॅम, उपप्राचार्य दिगंबर खटी सर, तथा क्रीड़ा शिक्षक मुस्तफा हबीब बख्श सर, सचिन मुळे सर, प्रणिता चिंतलवार मॅडम , रेखा माकडे मॅडम व सर्व शिक्षक वृंदाना दिले
त्यांचे यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरावरुन अभिनंदन व कौतुक करण्यात येत आहे,
Total Users : 10829