
शिक्षक सेनेचे ठिय्या आंदोलन…
ji24news
आज सोमवार दिनांक ११/९/२०२३ रोजी विक्रमगड तालुका शिक्षक सेनेतर्फे अशैक्षणिक कामांविरोधात पं.स. विक्रमगड येथे जोरदार ठिय्या आंदोलन करण्यात आले. आंदोलनाला जिल्हाप्रमुख विकासजी मोरे, उपजिल्हाप्रमुख सुरेशजी पालवी,पालघर लोकसभा सहसंपर्कप्रमुख निलेशजी गंधे, विक्रमगड पं.स. सभापती कानोजा सर, उपजिल्हा महिलासंघटक वैष्णवीताई व्यापारी, तालुकाप्रमुख संजयजी आगीवले,राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष रमेश जी दोडे,जि.प. सदस्य भारती कामडी मॅडम, तालुका संघटक विजयजी वेखंडे सर,पं. स. सदस्य नम्रताताई गोवारी, नरेशजी गोवारी तालुका सचिव, दिनेश खिलारे वाडा तालुका शिक्षक सेना अध्यक्ष,विलासजी घाटाळ उपतालुकाप्रमुख, मिलिंदजी महाकाळ विभागप्रमुख इत्यादी पदाधिकारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे उपस्थित होते. त्यांनी शिक्षकांना संबोधित करुन मार्गदर्शन केले व सदैव आपला पक्ष शिक्षकांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील अशी ग्वाही दिली.
गटविकास अधिकारी श्री हनुमंतराव दोडके साहेब यांनी शिक्षक सेनेच्या शिष्टमंडळाला वेळ देऊन चर्चा केली व सर्व प्रश्नांबाबत सकारात्मक मत व्यक्त केले आणि माझ्याकडून कोणताही विलंब किंवा अडथळा शिक्षकांच्या कामात राहणार नाही अशी ग्वाही दिली.
आंदोलन यशस्वी करण्यासाठी शिक्षकसेना तालुका अध्यक्ष किरण सातवी, सरचिटणीस भूपेंद्र चातुर्य, कार्याध्यक्ष रामू डबके, आत्माराम हरड जिल्हा कोषाध्यक्ष, रामू भोईर जिल्हा उपाध्यक्ष, दत्ता मदने,प्रदीप तारवी, शशी तारवी, अरुण गाढे या शिक्षकांनी
विशेष प्रयत्न केले.
Total Users : 10829