
पालघर जिल्ह्यातील प्रसिद्घ खगोल अभ्यासक व विज्ञान लेखक चंद्रकांत घाटाळ यांच्या बहुचर्चित डम्पी या विज्ञान कथासंग्रहाचा प्रकाशन सोहळा संपन्न .
ji 24 news पालघर .
पालघर जिल्ह्यातील प्रसिद्घ खगोल अभ्यासक व विज्ञान लेखक चंद्रकांत घाटाळ यांच्या बहुचर्चित डम्पी या विज्ञान कथासंग्रहाचा प्रकाशन सोहळा शनिवार दिनांक १६सप्टेंबर रोजी सोनोपंत दांडेकर महाविद्यालयात प्रा. डॉ. किरण सावे यांच्या अध्यक्षतेखाली पालघर येथे थाटात पार पडला. सदर कार्यक्रमात प्रमूख अतिथी म्हणुन चंद्रकांत घाटाळ यांनी विज्ञान कथांचा जन्म व आस्वाद या विषयांवर व्याखान दिले. याला महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक कुडुसर यांनी केले व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दर्शना मॅडम यांनी केले.
या कार्यक्रमासाठी संस्थेचे पदाधिकारी ठाकूर सर, माजी जि. प. अध्यक्षा वैदही वाढाण, सुप्रिया उराडे, नवयुगचे संपादक रमाकांत पाटील, डिंपल प्रकाशनचे प्रतिनिधी अनंत घाटाळ ,सामाजिक कार्यकर्ते राजीव डोंबरे ,मनोज दांडेकर तसेच अनेक पत्रकार व लेखक उपस्थित होते.
Total Users : 10829