ji24news

अभिव्यक्ती ‘ चित्रप्रदर्शनाचे जहाँगीर आर्ट गॅलरीत आयोजन…

अभिव्यक्ती ‘ चित्रप्रदर्शनाचे जहाँगीर आर्ट गॅलरीत आयोजन..

पालघर  ;-ji24news

पालघर येथील चित्रकार श्री.धिरज पाटील,श्री.प्रदिप घाडगे व श्री.उज्ज्वल पारगांवकर या कलावंतांनी साकारलेल्या चित्रांचे प्रदर्शन मुंबई येथील जहाँगीर आर्ट गॅलरीत दि.२५ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर २०२३ पर्यंत आयोजित करण्यात आले आहे.
प्रदर्शन सकाळी ११ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत रसिकांसाठी खुले राहील.
प्रदर्शनाचे उदघाटन सुप्रसिद्ध अभिनेत्री व संस्कृती कला दर्पण च्या प्रेसिडेंट मा.सौ.अर्चना नेवरेकर यांचे हस्ते करण्यात येणार आहे.
मानवी भाव भावनांच्या सुंदर जाणिवा निसर्गाशी समरूप करून भावनांचे अलगद उमटणारे मानवी कंगोरे आपल्या अलंकारिक रंग कुंचल्यातून चित्रकार श्री.धिरज पाटील, (पाटबंधारे विभाग, पालघर)यांनी अभिव्यक्त केले आहेत.
परमेश्वराच्या भक्तीत तल्लीन झालेली मानवी मनाची अवस्था व भक्तीमय भावना हे आषय आपल्या वास्तववादी चित्र शैलीतून चित्रकार श्री.प्रदिप घाडगे (पालघर) यांनी उत्तम प्रकारे अभिव्यक्त केले आहेत.
तसेच मुर्त चित्र निर्मितीला छेद देत आकाराची मुलभूत व्याख्या बाजूला सारून नवनिर्मितीची आस धरणारे चित्रकार श्री.उज्ज्वल पारगांवकर ( कला शिक्षक,लाल बहादूर शास्त्री हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, मनोर,जि.पालघर.) यांनी आपल्या अमुर्त शैलीतील चित्रातून रंगाचा मुक्त आविष्कार अभिव्यक्त केला आहे.
रंग, आकार व अवकाश या सशक्त माध्यमातून कोऱ्या कॅनव्हासवर अवतरलेली ही अभिव्यक्ती रसिकांच्या मनास नक्कीच आनंददायी असेल.
पालघर येथील या चित्रकारांनी अभिव्यक्तीने ओतप्रोत भरलेल्या सुंदर कलाकृती प्रदर्शनात सादर केलेल्या आहेत.आपण सर्वांनी प्रदर्शनास भेट देऊन या प्रतिभावान कलावंतांना प्रोत्साहन द्यावे ही विनंती.

ji24news
Author: ji24news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Panchang

Gold & Silver Price

Top News

Advertisement

Our Visitor

0 1 0 8 2 9
Total Users : 10829

Covid Update

जि.प.उच्च प्राथ.शाळा बांधण शाळेत अक्षरधारा फाउंडेशन ट्रस्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेतील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक शाहित्य.

आदिवासी हक्क संघर्ष समितीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न…

20 वर्षांपासून पुलाची प्रतीक्षा; हिरडपाडा ग्रामस्थांचा मतदान बहिष्काराचा इशारा.लेंडी नदीवरील कायमस्वरूपी पुलासाठी दोन दशकांचा संघर्ष; ८ हजार नागरिकांचा प्रश्न ऐरणीवर

अल्ट्रा चॅम्पियन ” विशाल वळवीच्या उत्कृष्ट कामगिरीचा आदिवासी बांधवांकडून सन्मान.

अतिवृष्टीमुळे सांबरपाड्याचा एकमेव रस्त्यावर दरड कोसळून; ग्रामस्थांची मोठी गैरसोय, आमदारांना दिलेल्या निवेदनानंतरही कार्यवाही नाही

विक्रमगड आठवडे बाजाराला भरभरून प्रतिसाद मात्र शौचालयाची असुविधा – जनतेसाठी मोठा प्रश्न ?

मोखाडा तालुक्यातील १० वी-१२ वी च्या विद्यार्थ्यांना आनंददायी परीक्षेसाठी वैशाली पाटील यांचे मार्गदर्शन.

रोमहर्षक सामन्यात के के किंग 11संघाची बाजी.

दुसऱ्या फ्रीस्टाईल स्केट कार्टींगच्या नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये मोखाडा तालुक्यातील गाडर भगिनींनी पटकवाले दोन गोल्ड व एक ब्रॉन्झ मेडल्स.

पालघर: एसटीच्या लहरी कारभारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात; परीक्षेलाही पोहोचण्यास होतोय उशीर