
विविध क्षेत्रात यशाची उत्तुंग शिखरे गाठणाऱ्या व्यक्तींचा सत्कार सोहळा संपन्न ..
पालघर ji 2 4 news .
रविवार दिनांक २४ सप्टेंबर रोजी सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ जव्हार या १२६ वर्षांची परंपरा लाभलेल्या मंडळाने कर्तुत्वाचा झेंडा रोविला या कार्यक्रमा अंतर्गत विवध क्षेत्रात यशाची उत्तुंग शिखरे गाठणाऱ्या व्यक्तींचा सत्कार सोहळा आयोजित केला होता. १ कविता शिवराम दांगटे
२ जहीर हमीद शेख
३ चंद्रकांत बुध्या घाटाळ
४ शंकर दामू चौधरी
५ वीणा अजित माच्छी
६ सोनू धवळू म्हसे
या विविध क्षेत्रातल्या सहा सत्कारमूर्तींचा समावेश होता.
या सत्कार सोहळ्यासाठी पालघर जिल्ह्यातील प्रसिध्द खगोलअभ्यासक व लेखक श्री. चंद्रकांत घाटाळ यांचीही निवड होऊन मंडळाने त्यांना या सोहळ्यासाठी आमंत्रित केले होते.
सदर कार्यक्रमासाठी अनेक मान्यवरांसोबत महाराष्ट्र राज्याचे ‘मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाचे’ प्रमुख मा. मंगेश चिवटे साहेब उपस्थित होते. त्यांनी आपल्या मनोगतातून आरोग्य विषयक अनेक योजनांची माहिती दिली.. .
या कार्यक्रमा दरम्यान अनेक मुलांनी अतिशय दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. .त्यांत बासरी वादन ,गणेश वंदना, कथ्थक नृत्य ,कोळीगीत, मंगळागौर यांचा प्रामुख्याने समावेश होता.
सदर कार्यक्रमासाठी मंडळाने अतिशय भव्य असं डिजिटल स्टेज तयार केले होते. या अनोख्या व दर्जेदार सोहळ्याचा संपूर्ण जव्हारकरांनी आनंद घेतला.
Total Users : 10829