
खादी ग्रामोद्योग पालघर विभागाने घोलवडला मधाचे गाव म्हणून मंजुरी देण्यास सकारात्मक …
पालघर ji2 4 न्यूज ..
खादी ग्रामोद्योग पालघर विभागाने घोलवडला मधाचे गाव म्हणून मंजुरी देण्यास सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी या प्रस्तावाला मान्यता दिल्याने चिकूनंतर आता घोलवडची ओळख मधाचे गाव म्हणून होणार आहे.
घोलवड गावात अनेक विकासाची कामे सुरू झाली असून या भागात असलेल्या शेती-बागायतीचा नैसर्गिक व पर्यावरणपूरक शेती करण्यासाठी उपयोग करण्यात यावा म्हणून खादी ग्रामोद्योग विभागाने घोलवड गावाला ‘मधाचे’ गाव म्हणून विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व ग्रामस्थ, शेतकरी आणि बागायतदारांनी या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला सहकार्य करावे, असे आवाहन सरपंच रवींद्र बुजड यांनी केले आहे.
जिल्हा परिषद खादी ग्रामोद्योग विभागाच्या अधिकारी अंजना गायकवाड, सचिव आनंद चौधरी यांनी हा प्रस्ताव सादर केला होता. पालघर जिल्हाधिकारी बोडके यांनी प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. या निर्णयाचे सरपंच बुजड व उपसरपंच कुणाल शहा यांनी स्वागत केले
Total Users : 10829