
महाराष्ट्र राज्य तलासरी सीमेलगतच्या केंद्र शासित प्रदेशातून होणार्या मद्य तस्करी रोखण्यात उत्पादन शुल्क विभागाला यश….
तलासरी प्रतिनिधि ji 24 news
महाराष्ट्र राज्य तलासरी सीमेलगतच्या केंद्र शासित प्रदेशातून होणार्या मद्य तस्करी रोखण्यात उत्पादन शुल्क विभागाला यश आले आहे. डहाणू निरीक्षक कार्यालयाच्या पथकाने कारवाई करीत कार जप्त केली आहेत.
कारवाईत 52 बॉक्स दारूच्या साठ्यासह 21 लाख 78 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून कार चालक पार्थ कुमार सुभाष पटेल (वय.27रा.पारडी , गुजरात,) याला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
केंद्र शासित प्रदेशातून पालघर जिल्ह्याच्या सीमा भागातून दमण बनावटीच्या दारूच्या तस्करीवर आळा घालण्यासाठी उत्पादन शुल्क विभागाकडून सीमा भागात दिवसरात्र गस्त घातली जात आहे.कारवाई उत्पादन शुल्क विभागाचे पालघर जिल्हा अधीक्षक सुधाकर कदम,उप-अधीक्षक बाबासाहेब भूतकर यांच्या मार्गदर्शनात उत्पादन शुल्क विभागाच्या डहाणू कार्यालयाचे निरीक्षक महेश धनशेट्टी, दुय्यम निरीक्षक एम.एम. मानकर, किरण बी.धिंदळे, जवान के.डी.भुरकुड , पी.जे.राठोड, कमलेश पैदाम, महेंद्र पाडवी यांच्या पथकाने केली.
Total Users : 10829