
हेदअंबा पाड्यावरच्या अंगणवाडीची दुरावस्था..
प्रतिनिधी- ji24news त्रंबकेश्वर जयवंत हागोटे
बालकांच्या सर्वांगीण विकासाचा डंका पिटणाऱ्या प्रशासनाचे मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे अंगणवाड्यांमध्ये प्राथमिक सुविधांची वाणवा ग्रामीण भागातल्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यात मोठा वाटा उचलणाऱ्या अंगणवाड्यांची ही अवस्था दिसून येत आहे त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हेदअंबा या पाड्यावरच्या अंगणवाडीची दुरावस्था या अंगणवाडीच्या खिडक्या, दरवाजे, शौचालय, किचन फुटून तुटून गेलेले आहेत अंगणवाडीच्या भिंतीवर लव स्टोऱ्या लिहून ठेवलेल्या आहेत बालकांनी शिक्षण घ्यायचे की भिंतीवरच्या लव स्टोऱ्या वाचायच्या अंगणवाडीमध्ये अतिशय घाण पसरलेली आहे अंगणवाडीची इमारत बांधून पाच वर्षे झाले आहेत अजून एकदाही अंगणवाडी भरलेली नाही तसेच जो काही अंगणवाडीचा आहार येतो तो वेळेवर वाटला जात नाही एक वर्ष होऊन गेले अंगणवाडीच भरलेली नाही ही अतिशय गंभीर बाब आहे प्रशासनाने या अंगणवाडी कडे त्वरित लक्ष देऊन लवकरात लवकर दुरुस्ती करण्याची मागणी गावातील नागरिक करत आहेत.

Total Users : 10829