
पोलीस स्टेशन वडणेरला नवरात्रीच्या निमित्याने मांस विक्रीची दुकाने दहा दिवसासाठी बंद ठेवण्याबाबत दिले निवेदन.
प्रा.दिनेश राठोड (ji24news)
जिल्हा प्रतिनिधी – वर्धा
स्थानिक वडणेर येथील पोलीस ठाण्याचे एपीआय मा श्री संजय मिश्रा साहेबांना नवरात्री निमित्याने परिसरात दारू विक्री व मास विक्री करणारी दुकाने दहा दिवसासाठी प्रतिबंधित ठेवण्याबाबत गावातील समस्त नागरिक व ग्रामपंचायत सदस्य गुरुदयालसिंघ जुनी वर्धा जिल्हा ( उपाध्यक्ष ) राष्ट्रवादी युवक काँग्रेस यांचे कडून निवेदन देण्यात आले, नवरात्रीमध्ये शांतता व सुव्यवस्था राहावी व नवरात्रोत्सव शांततेत पार पडावा तसेच १५ ऑक्टोबर ते २५ ऑक्टोबर या काळात नवरात्रीच्या सण आहे त्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये,म्हणून संपूर्ण परिसरातील नागरिक तसेच युवक व मंडळांनी मिळून हे निवेदन दिले प्रसंगी, राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष गुरुदयालसिंग . सो.जुनी व युवक मंडळ सदस्य यांनी आज ठाणेदार एपीआय मा. श्री संजय मिश्रा साहेब यांना आज निवेदन देण्यात आले निवेदन देता वेळी नानाभाऊ माणिकपुरे, सागर भाऊ बोंबले, प्रशांतभाऊ दरोडे, मयूरभाऊ पोहाणे, दिनेशभाऊ चंदनखेडे, डॉ सचिनभाऊ महाजन, हेमंतभाऊ भोयर, निलेशभाऊ हाडके, विजयभाऊ लाटकर , तुषारभाऊ दुर्गे, निलेदाभाऊ कुडमते , किशोरभाऊ हुलके, सुदेशभाऊ चव्हाण , प्रज्वलभाऊ चांगले, सारंगभाऊ सुरकार , नैतिकभाऊ सुरकार , साहिलभाऊ दुर्गे ,आदर्शभाऊ तेलतुंबडे,विलासरावजी हारगुडे, स्वप्निलभाऊ बावणे , अक्षयभाऊ झुनघरे , अनिकेतभाऊ सुरकार, शुभमभाऊ शेंडे, प्रवीणभाऊ झुनघरे, अनिकेतभाऊ वाघ अनिकेतभाऊ कुबडे, गौरवभाऊ भुते, अनिलभाऊ चांदकर, अविनाशभाऊ भगत, भूषणभाऊ घंगरे, शंकरभाऊ वैतागे, सचिनभाऊ महाजन, पत्रकार व समस्त नागरिक युवक मित्रपरिवार उपस्थित होते
Total Users : 10829