
श्री साईबाबा लोकप्रबोधन कला महाविद्यालयात अर्थशास्त्र अभ्यास मंडळाचे उद्घाटन व मार्गदर्शन कार्यक्रम
प्रा. दिनेश राठोड (ji24news) जिल्हा प्रतिनिधी वर्धा
वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील वडनेर येथील श्री साईबाबा लोकप्रबोधन कला महाविद्या लयातील अर्थशास्त्र अभ्यास मंडळाचा उद्घाटन व मार्गदर्शन याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.’डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांचे कृषी क्षेत्रातील योगदान’ या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले.या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डाँ. उत्तम पारेकर, कार्यक्रमाच्या उद्घघाटक उपप्राचार्य डॉ. सारिका चौधरी, प्रमुख मार्गदर्शक डॉ. शालिनी हटवार, प्रा. अमोल घुमडे, कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. विठ्ठल घिनमिने, डॉ. नितेश तेलहांडे, अर्थशास्त्र अभ्यास मंडळाच्या अध्यक्षा कु. हर्षा ढोबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
महाविद्यालयातील अर्थशास्त्र अभ्यास मंडळ विविध उपक्रमाचे आयोजन करीत असते. यामध्ये विशेष मार्गदर्शन कार्यक्रम, राष्ट्रीय किसान दिवस, राष्ट्रीय ग्राहक दिवस, अंदाजपत्रकाचा कार्यक्रम, शैक्षणिक सहलीचे आयोजन, आज डॉ.स्वामीनाथन यांचे कृषी क्षेत्रातील योगदान अनन्य साधारण आहे म्हणूनच त्यांना विविध पुरस्काराने गौरविण्यात होते. त्यांचे कार्य विद्यार्थ्याना माहित व्हावे हा उद्देश ठेवून या विषयावर कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याचे अर्थशास्त्र विभाग प्रमुख व कार्यक्रम संयोजक डॉ. विठ्ठल घिनमीने यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणातून विचार व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या उद्घाटक महाविद्यालयाच्या उपप्राचार्या डॉ. सारिका चौधरी यांनी महाविद्यालयात घेण्यात येणाऱ्या उपक्रमाची माहिती दिली.तसेच आपले महाविद्यालय विद्यार्थ्यांना स्पर्धेच्या काळात घडवण्यासाठी सतत प्रयत्नशील असते. असे त्यांनी आपल्या उद्घाटनिय भाषणातून विचार व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या मार्गदर्शिका डॉ.शालिनी हटवार यांनी भारतीय हरितक्रांती आणि ती यशस्वी होण्यास डॉ. स्वामीनाथन यांची असणारी भूमिका व त्यांचे योगदान यांच्यावर विस्तृत असे भाष्य केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यास भारतात दुसरी हरितक्रांती येऊ शकते असे मत त्यांनी व्यक्त केले.
महाविद्यालयाचे प्राचार्य कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. उत्तमरावजी पारेकर यांनी भारतीय शेतीत झालेल्या नवनवीन सुधारणा तसेच रोजगाराच्या नवीन संधी आणि या संधीच्या माध्यमातून जागतिकीकरणाच्या या काळात शेतकऱ्यांनी आपली शेती प्रगत कशी करता येईल यावर भाष्य केले. याशिवाय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना नवनवीन रोजगाराच्या संधी कशा उपलब्ध होतील या विषयावर विचार व्यक्त केले.
या कार्यक्रमाला डॉ. प्रवीण कारंजकर, डॉ.गणेश बहादे, डॉ.पंकज मून, प्रा.आरती देशमुख, नरेश कातडे, शंकर कापसे, संजय पर्बत. प्रीती सायंकार यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे संचालन प्रा. डॉ. संजय दिवेकर यांनी केले. तर आभार चेतन साटोणे यांनी मानले. यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी,विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रफुल शिंदे,चेतन साटोने, सोनल दोडके, आचल चौधरी, हेमलता तिजारे,वैष्णवी खोडे, संजना उमाटे, हर्षा ढोबळे, बंन्नू लोहकरे, आकाश शिंदे, आचल निरसकर, अनुश्री पाटील, अजित उईके आणि शिक्षकेतर कर्मचारी अंकुश वैद्य, अरुण तीमांडे, विजयालक्ष्मी जारोंडे यांनी विशेष परिश्रम घेतले
Total Users : 10829