
‘आदिवासी लोककथा’ लवकरच प्रकाशित ..
पालघर ji24news
पालघर जिल्ह्यातील सुप्रसिद्ध खगोल अभ्यासक व लेखक यांचा ‘आदिवासी लोककथा’ हा कथासंग्रह लवकरच प्रकाशित होत असुन यांतील मनोरंजक कथा दिवाळीपर्यंत वाचकांच्या हाती मिळणार आहेत. हे पुस्तक समीक्षा पब्लिकेशन पंढरपूर यांच्या मार्फत प्रकाशित होणार असुन. सदर पुस्तकासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजलेले वारली चित्रकार विजय वाडू यांनी अतिशय आकर्षक मुखपृष्ठ साकारले आहे.
आदिवासी लोककथांमध्ये रंजक, वैज्ञानिक, विनोदी,भावनिक, गूढ, रहस्य तसेच माहितीपर कथा आहेत. ज्या आदिम काळापासून पिढ्यान पिढ्या चालत आल्या आहेत. या कथांमध्ये आता इतर समाजाचे बरेच अतिक्रमण झाले आहे. त्यामुळे मूळ कथा काहीश्या लोप पावल्या आहेत.म्हणुन या कथांचा गोडवा काहीसा कमी झाला आहे. याच आणखी एक महत्वाचं कारण म्हणजे त्या काळात लिपीचा शोध नसल्याने या कथा कुठेही लिखित स्वरूपाच्या नाहीत. मुखाद्वारेच याचा प्रचार आणि प्रसार झाला आहे. त्यात गोष्ट सांगणाऱ्याने वेळोवळी स्वतःच मत आणि कल्पना टाकल्या त्यामुळे ह्या कथा काहीश्या बदलत गेल्या. मग ती भाषेच्या बाबतीत असेल, सामाजिक परिस्थिती असेल किंव्हा आणखी काही.
या पुस्तकात घाटाळ यांनी काही निवडक आदिवासी लोककथा शब्दांकन व स्वतः ची कल्पनाशक्ती वापरून काहीश्या प्रमाण भाषेत मांडल्या आहेत. याचा मुख्य उद्देश आदिवासी लोककथा ह्या सर्वाना समजाव्यात असा आहे. कारण आदिवासी लोकांच ज्ञान हे सीमित न राहता सर्वदूर त्याचा प्रसार व्हावा असं त्यांना वाटते.
त्यांनी शब्दांकन केलेल्या लोककथा सर्वाना आवडतील अशी आशा घाटाळ यांना आहे.
Total Users : 10829