
अस्पी कृषी संशोधन आणि विकास प्रतिष्ठान मुंबई तर्फे शेतकरी मेळावा .
ji24news
कुडुस – नारे – (सचिन शेलवले ) १८/१०/२०२३ रोजी अस्पी कृषी संशोधन आणि विकास प्रतिष्ठान मुंबई तर्फे आयोजक स्वप्निल देखणे यांच्या तर्फे अस्पी तानसा फार्म नारे फाटा ता . वाडा येथे शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता . या मेळाव्यात विषय होता भाजीपाला लागवड , व्यवस्थापन व विक्री या संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी प्रमुख अतिथी म्हणुन डॉ . राजेंद्र सावळे वरिष्ठ संशोधन सहाय्यक, प्रादेशिक कृषी संशोधन केंद्र, कर्जत जि. रायगड हे कार्यक्रमाला वेळेवर उपस्थित झाले होते . डॉ राजेद्र सावळे यांनी प्रथम कार्यकृम चालू होण्याच्या पूर्वी आंब्याची लागवड कशी करायची त्यांना खते व औषधे कशी घ्यायची . त्यांची निगा कशी राखायची तसेच प्रत्येक शेतकऱ्याच्या प्रश्नांची उत्तरे त्यांनी दिली . त्या नंतर शेतकर्यांना नविन आधुनिक यंत्राने भाताची कापणी कशी करायची या संदर्भात माहिती दिली . त्यानंतर शेतकरी मेळावा कार्यक्रमाला सुरुवात झाली . प्रमुख पाहुणे म्हणुन विजय पाटील खंबाळा प्रमुख अतिथी मार्गदर्शक म्हणुन डॉ . राजेंद्र सावळे होते . सरांनी दररोजच्या जीवनात परिचयातील निवडक भाजीपाला भेंडी, टोमॅटो, काकडी, कारली, शिरोळा, कांदा, दोडकी, भोपळा, सुरण, मेथी, पालक, मुळा, आलु या प्रमुख भाज्यांची लागवड कोणत्या हंगामात करायची . ती करण्या पूर्वी मशागत कशी करायची व त्यावर खते व औषधे फवारणी कशी करायची या संदर्भात सखोल मार्गदर्शन केले . त्यानंतर नरेंद्र पाटील झिडका यांनी आताच्या काळात गट शेती कशी करायची ती आता योग्य कशी आहे . तसेच भाजीपाला सुद्धा गटपद्धतीने काढुन ते विकण्या संदर्भात मार्गदर्शन केले . त्यानतर कार्यकमाचे अध्यक्ष विजय पाटील खंबाळा यांनी अस्ची कृषी संशोधन आणि विकास प्रतिष्ठान मुंबई यांच्या मालकाशी माझे १९८७ सालापासुन संबंध होते . त्यांच्या प्रत्येक मेळाव्याला मी हजर राहतो . त्यामुळे येथे शेतकर्यांना नविन नविन तंत्रज्ञान व मार्गदर्शन मिळते . सर्वांनी प्लास्टीक पद्धतीने शेती केली पाहिजे . नविन नविन तंत्रज्ञान अवगत केले पाहिजे . शासनाच्या मिळणाऱ्या योजनांचा लाभ घेतला पाहिजे . कार्यक्रमासाठी शेतकऱ्यांसाठी चहापाणी तसेच भोजनाची सुद्धा व्यवस्था केली होती . अस्पी कृषी संशोधन तर्फे मार्गदर्शन करणाऱ्या अतिथीस एक छोटीसी भेट देण्यात आली . अशा प्रकारे शेवटी आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली .
Total Users : 10829