
नवरात्रीनिमित्त शैक्षणिक साहित्याचे वाटप *
ji24news.
विक्रमगड तालुक्यातील निसर्गाच्या कुशीत असलेले मोहो खुर्द गावामधे आज नवरात्रनिमित्ताने जय दुर्गा माता मंदिर मोहो खुर्द येथे जिल्हा परिषद शाळेतील व अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा माण, ता.विक्रमगड,जि.पालघर यांच्या विशेष सहकार्याने शैक्षणिक साहित्य व खाऊचे वाटप करण्यात आले.यावेळी संस्थेचे संचालक श्री. यशवंत वातास सर व प्राथमिक मुख्याध्यापक श्री.गिरिधर रिकामे सर हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहिले.त्यांनी मुलांना अभ्यासाबाबत मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाला गावातील सर्व नागरिक उपस्थित राहून त्यांच्या शुभहस्ते शैक्षिणक वस्तूचे वाटप करण्यात आले.या कार्यक्रमासाठी श्री.चेतन ठाकरे सरांनी सूत्रसंचालन करून कार्यक्रमाची सांगता केली.नवरात्रीचे हे 44 वे वर्ष आहे.त्यानिमित्ताने सामाजिक,सांस्कृतिक,शैक्षणिक व धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.दिनांक 22.10.2023 वार रविवार रोजी सकाळी ठीक 10 वाजता मंदिरामध्ये मोफत आरोग्य व नेत्र तपासणी तसेच भव्य रक्तदान शिबिर आयोजित केले आहे,तरीही सर्वांनी याचा लाभ घ्यावा,असे आवाहन करण्यात आले आहे.
Total Users : 10829