ji24news

घानवळ गावातील तरुणांच्या अथक परीश्रमांना अखेर यश…बातमीची दखल ! सुरू झाली मोखाडा – घानवळ बस..

घानवळ गावातील तरुणांच्या अथक परीश्रमांना अखेर यश… बातमीची दखल !सुरू झाली मोखाडा – घानवळ बस…

जोहार इंडिया 24 न्यूज – मोखाडा ग्रामीण

मोखाडा ग्रामीण – मोखाडा – घानवळ बस पिंपळपाडा ते घानवळ रस्त्याच्या प्रचंड दुरावस्थेमुळे गेल्या पावसाळाभर बंद होती. या रस्त्यावर मोठ- मोठे खड्डे पडले होते तसेच डांबराचा थर वाहून गेला होता. त्यामुळे मोखाडा सार्वजनिक बांधकाम उपविभाग – मोखाडा यांच्याकडून रस्ता वाहतुकीसाठी योग्य नसल्याचा पत्रव्यवहार ग्रामस्थांना केला होता.
गेला पावसाळा भर बस बंद असल्यामुळे घानवळ,जांभूळमाथा बलद्याचापाडा आणि रुईपाडा येथील अबाल – वृद्ध, आजारी व्यक्ती आणि विद्यार्थी यांची बस अभावी तालुक्याच्या ठिकाणी जाताना जाऊन येऊन सहा किलोमीटरची पायपीट करावी लागत होती. परिणामी प्रवाशांना प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागत होता.
सर्व सामान्यांची गैरसोय थांबावी आणि अबाल- वृद्ध,आजारी व्यक्ती आणि विद्यार्थी सोयीसाठी घानवळचे सचिन वझरे, नवोदित कमी – हेमंत वारघडे, निवृत्ती भांगरे, कृष्णा राबडे,रोशन गाडर, अमृत शिंपी, नामदेव खरपडे हे तरुण पावसाळाभर पिंपळपाडा ते घानवळ रस्त्यावरील खड्डे सातत्याने श्रमदान करून बुजवत होते. अखेर त्यांच्या या अथक परिश्रमांना यश आले असून जव्हार आगाराच्या प्रमुखांनी मोखाडा – घानवळ बस सुरू केली आहे. ही बस सुरू झाल्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला असून त्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून येत आहे. श्रमदानाने खड्डे बुजवणाऱ्या तरुणांचे सामाजिक स्तरातून विशेष कौतुक होत आहे. भविष्यात प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांनी या प्रचंड दुरावस्था झालेला रस्ता तात्काळ नवीन बनवून सर्वसामान्यांना दिलासा द्यावा इतकीच माफक अपेक्षा. आता हा रस्ता येणाऱ्या काळात कधी नवीन डांबरीकरणाचा बनवला जातो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

ji24news
Author: ji24news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Panchang

Gold & Silver Price

Top News

Advertisement

Our Visitor

0 1 0 8 2 9
Total Users : 10829

Covid Update

जि.प.उच्च प्राथ.शाळा बांधण शाळेत अक्षरधारा फाउंडेशन ट्रस्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेतील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक शाहित्य.

आदिवासी हक्क संघर्ष समितीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न…

20 वर्षांपासून पुलाची प्रतीक्षा; हिरडपाडा ग्रामस्थांचा मतदान बहिष्काराचा इशारा.लेंडी नदीवरील कायमस्वरूपी पुलासाठी दोन दशकांचा संघर्ष; ८ हजार नागरिकांचा प्रश्न ऐरणीवर

अल्ट्रा चॅम्पियन ” विशाल वळवीच्या उत्कृष्ट कामगिरीचा आदिवासी बांधवांकडून सन्मान.

अतिवृष्टीमुळे सांबरपाड्याचा एकमेव रस्त्यावर दरड कोसळून; ग्रामस्थांची मोठी गैरसोय, आमदारांना दिलेल्या निवेदनानंतरही कार्यवाही नाही

विक्रमगड आठवडे बाजाराला भरभरून प्रतिसाद मात्र शौचालयाची असुविधा – जनतेसाठी मोठा प्रश्न ?

मोखाडा तालुक्यातील १० वी-१२ वी च्या विद्यार्थ्यांना आनंददायी परीक्षेसाठी वैशाली पाटील यांचे मार्गदर्शन.

रोमहर्षक सामन्यात के के किंग 11संघाची बाजी.

दुसऱ्या फ्रीस्टाईल स्केट कार्टींगच्या नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये मोखाडा तालुक्यातील गाडर भगिनींनी पटकवाले दोन गोल्ड व एक ब्रॉन्झ मेडल्स.

पालघर: एसटीच्या लहरी कारभारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात; परीक्षेलाही पोहोचण्यास होतोय उशीर