ji24news

वाड्यात आदिवासींचा दोन तास रास्ता रोको…..आरक्षण व नोकरीसाठी आदिवासींचा संघर्ष…

वाड्यात आदिवासींचा दोन तास रास्ता रोको…..
आरक्षण व नोकरीसाठी आदिवासींचा संघर्ष ….

वाडा ;ji 24 न्यूज 
वाडा : सरकारच्या मनमानी धोरणाचा निषेध करण्यासाठी व विविध मागण्यांसाठी वाडा -भिवंडी-मनोर या राज्य महामार्गावर येथील खंडेश्वरी नाका येथे दोन तास रास्ता रोको आंदोलन केले. त्यानंतर तहसीलदार कार्यालयावर नेलेल्या मोर्चाचे जाहीर सभेत रूपांतर करण्यात आले. आदिवासी संघर्ष समितीच्या नावाने आदिवासी समाजातील विविध संघटना यावेळी एकत्रित झाल्या होत्या.

वाडा तालुका आदिवासी संघर्ष समितीच्या वतीने बुधवारी खंडेश्वरीनाका येथे रास्ता रोको करून तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला होता.

धनगर (धनगड) समाजाला आदिवासी समाजाच्या कोट्यातून आरक्षण देण्यात येऊ नये, पेसा भरतीची त्वरित अंमलबजावणी करावी, महाराष्ट्र शासनाने ६ सप्टेंबरचा कंत्राटी नोकरभरती करण्यासाठी काढलेला शासननिर्णय त्वरित रद्द करणे, महाराष्ट्र राज्यातील ६२ हजार सरकारी शाळांचे खासगीकरण पूर्णपणे बंद करावे, ६ जुलै २०१७ च्या सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालांचा सन्मान राखून १७ पदांची सरकारी नोकरभरती त्वरित करावी, बोगस आदिवासींची चौकशी करून या कर्मचाऱ्यांचे तात्काळ निलंबन करावे, भूमिहीन कुटुंबाच्या घराखालील जागा त्वरित त्या कुटुंबाच्या नावे करणे, भूमिहीन आदिवासी कुटुंबाला पाच एकर जमीन त्वरित वाटप करावी, वनदावे आदिवासींच्या नावे करावेत, पेसा कायद्याची अंमलबजावणी त्वरित करावी, अशा विविध मागण्यांचे निवेदन या वेळी वाडा तहसीलदार यांना देण्यात आले.

ji24news
Author: ji24news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Panchang

Gold & Silver Price

Top News

Advertisement

Our Visitor

0 1 0 8 2 9
Total Users : 10829

Covid Update

जि.प.उच्च प्राथ.शाळा बांधण शाळेत अक्षरधारा फाउंडेशन ट्रस्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेतील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक शाहित्य.

आदिवासी हक्क संघर्ष समितीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न…

20 वर्षांपासून पुलाची प्रतीक्षा; हिरडपाडा ग्रामस्थांचा मतदान बहिष्काराचा इशारा.लेंडी नदीवरील कायमस्वरूपी पुलासाठी दोन दशकांचा संघर्ष; ८ हजार नागरिकांचा प्रश्न ऐरणीवर

अल्ट्रा चॅम्पियन ” विशाल वळवीच्या उत्कृष्ट कामगिरीचा आदिवासी बांधवांकडून सन्मान.

अतिवृष्टीमुळे सांबरपाड्याचा एकमेव रस्त्यावर दरड कोसळून; ग्रामस्थांची मोठी गैरसोय, आमदारांना दिलेल्या निवेदनानंतरही कार्यवाही नाही

विक्रमगड आठवडे बाजाराला भरभरून प्रतिसाद मात्र शौचालयाची असुविधा – जनतेसाठी मोठा प्रश्न ?

मोखाडा तालुक्यातील १० वी-१२ वी च्या विद्यार्थ्यांना आनंददायी परीक्षेसाठी वैशाली पाटील यांचे मार्गदर्शन.

रोमहर्षक सामन्यात के के किंग 11संघाची बाजी.

दुसऱ्या फ्रीस्टाईल स्केट कार्टींगच्या नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये मोखाडा तालुक्यातील गाडर भगिनींनी पटकवाले दोन गोल्ड व एक ब्रॉन्झ मेडल्स.

पालघर: एसटीच्या लहरी कारभारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात; परीक्षेलाही पोहोचण्यास होतोय उशीर